जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; ४जणांचा मृत्यू तर ४० जण बेपत्ता
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; ४जणांचा मृत्यू तर ४० जण बेपत्ता Twitter/@ANI
देश विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; ४जणांचा मृत्यू तर ४० जण बेपत्ता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था

देशात मान्सूनला (Monsoon) उशीराने सुरुवात झाली, मात्र अनेक राज्यांंमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती (Floods) निर्माण झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), हरियाणा (Hariyana), दिल्ली (Delhi) आणि जम्मू-कश्मीरमध्ये (jammu-kashmir) देखील पावसाने कहर माजवला आहे. आज सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड (Kishtwad) जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू तर ४० हून अधिकजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. (Cloudburst in Jammu and Kashmir; 4 killed, 40 missing)

किश्तवाडचे उपायुक्त अशोक कुमार शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. किश्तवाड़ शहर जम्मूपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. तसेच किश्तवार जिल्हा पुर्णपणे दुर्गम आणि डोंगराळ परिसरात आहे. जिल्ह्यातील होंजार दचान या गावात बुधवारी पहाटे ढगफुटी सदृश पाऊस पडला. या पावसात सुमारे ४० हून अधिक लोक बेपत्ता झाले असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच बचाव आपत्तीग्रस्त भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. किश्तवारमधील बचावकार्यासाठी कॅप्टन विवेक चौहान यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने २२ सदस्यांची टीमही पाठविली आहे. येथे बचावकार्य सातत्याने सुरू आहे. किश्तवार जिल्ह्यातील दचान, गुलाबगड भागात बुधवारी सकाळी ढगफुटीनंतर भारतीय सैन्याने बचाव कार्याला सुरुवात केली आहे.

जम्मू भागातील बर्‍याच भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यासह बचाव कार्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरकडूनही मदत घेण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे नेटवर्कमध्येही संकटात सापडलेल्या लोकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. मात्र बचाव कार्यासाठी सैन्य आणि पोलिसांचे एक पथक त्या भागात पाठविण्यात आले आहे.

जुलैच्या अखेरीस अधिक पावसाचा अंदाज वर्तवल्याने किश्तवाडमधील अधिकाऱ्यांनी जलाशयांच्या आसपास आणि भूस्खलनग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. “येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नद्या, नाल्यांमध्ये पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे, नद्या, नाले, जलसाठा आणि दरडी कोसण्याच्या घटना घडणाऱ्या भागाच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. अशा भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सुचना किश्तवाडच्या उपायुक्तांनी आधीच दिल्या आहेत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

SCROLL FOR NEXT