भालाफेकमध्ये भारताचं नाव रोशन करणारा दिग्गज नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने सर्वांचं मन जिंकलंय. ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने २०२४ च्या ऑलिम्पिकपूर्वीच पुरस्कार जिंकण्याचा धमाका सुरू केलाय. चोप्राने फेडरेशन कप २०२४ मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत ३ वर्षांनंतर होम ट्रॅकवर खेळला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर तो नीरज ३ वर्षांनंतर भालाफेक खेळत होता. त्याने ८२.२७ मीटर भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावलंय.
२०२१ पासून फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्राचं वर्चस्व आहे. त्यादरम्यान त्याने ८७.८० मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. अलीकडेच दोहा डायमंड लीगमध्ये नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यादरम्यान त्याने ८८.३६ मीटरपर्यंत भाला फेकला होता. दरम्यान भालाफेकमध्ये नीरज चोप्राचा राष्ट्रीय विक्रम ८९.९४ मीटरचा ल आहे. जगज्जेत्याचे लक्ष्य ९०० मीटरचा टप्पा ओलांडण्याचं आहे. मात्र आजतागायत त्याला त्यांच्या ध्येयात यश आलेले नाहीये. या स्पर्धेतही तो हे लक्ष्य गाठू शकला नाहीये.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८२ मीटर भाला फेकला. तर रौप्यपदक जिंकणाऱ्या डीपी मनूने पहिल्याच प्रयत्नात ८२.०६ मीटरपर्यंत भाला फेकला होता. पहिल्या फेरीनंतर नीरज दुसऱ्या क्रमांकावर तर डीपी मनू आघाडीवर होता. नीरजचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला. दुसऱ्या प्रयत्नाने नीरजला आनंद झाला नाही आणि त्याला वाटले की त्याने मुद्दाम फाऊल घेतला आहे.
डीपी मनूने दुसऱ्या प्रयत्नात ७७.२३ हे अंतर कापले होते. तिसऱ्या फेरीतही डीपी मनू ८२.०६ गुणांसह आघाडीवर होता. चौथ्या प्रयत्नात ८२.२७ च्या थ्रोनंतर नीरज चोप्राने मनूला मागे टाकले. डीपी मनूने नीरज चोप्राला अप्रतिम झुंज दिली. मात्र अखेर विश्वविजेत्याने सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात त्याला मात दिली. डीपी मनूने रौप्यपदक पटकावले. उत्तम पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने ७८. ३९ मीटरपर्यंत भाला फेकण्यास तो यशस्वी राहिला. उत्तमने तिसऱ्यास्थानी राहत कांस्यपदक जिंकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.