Pegasus issue : पश्चिम बंगालमध्ये चौकशी समितीची स्थापना

ही समिती बेकायदेशीर हॅकिंग (Hacking), देखरेख, पाळत ठेवणे, मोबाईल फोन रेकॉर्डिंग (Phone Tapping) इत्यादींवर नजर ठेवणार आहे.
Pegasus issue : पश्चिम बंगालमध्ये चौकशी समितीची स्थापना
Pegasus issue : पश्चिम बंगालमध्ये चौकशी समितीची स्थापनाTwitter/@PMOIndia
Published On

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( CM Mamta Banarjee) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात सध्या चर्चेत असलेल्या पिगासस प्रकरणी (Pegasus spyware) त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पिगासस स्पायवेअर प्रकरणाची चौकशी करण्यासाठा एका समितीची स्थापना केली आहे. ज्येष्ठ न्यायाधीश मदन भीमराव लोकुर आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ज्योतिर्मय भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात आम्ही आयोगाची स्थापना केली आहे. ही समिती बेकायदेशीर हॅकिंग, देखरेख, पाळत ठेवणे, मोबाईल फोन रेकॉर्डिंग इत्यादींवर नजर ठेवणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. (Establishment of a committee to investigate the Pegasus spyware case in West Bengal)

Pegasus issue : पश्चिम बंगालमध्ये चौकशी समितीची स्थापना
जेव्हा विदेशी अधिकारी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देतो

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाद्वारे चौकशी करण्याचे निर्देश देईल, अशी आम्हाल अपेक्षा होती. मात्र केंद्रसरकारने तसे केले नाही. मात्र पिगासस प्रकरणाची चौकशी करणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पिगासस प्रकरणामुळे देशात चांगलीच खळबळ माजली होती. पिगासस हा स्पायवेअरचा एक प्रकार असून, लोकांच्या फोनची हेरगिरी करण्यासाठी याचा वापर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने 2017 ते 2019 याकाळात सुमारे 300 हून अधिक भारतीयांची हेरगिरी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी खुलासा केला आहे. केंद्र सरकारने पिगासस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील काही पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी नेते आणि उद्योजकांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अहवालानंतर सरकारने सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

ममता बॅनर्जी पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी काल राष्ट्रीय़ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. तर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनीदेखील सीएम ममतांची भेट घेतली. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील दिल्लीतील ममता बॅनर्जी यांच्या दक्षिण अ‍ॅव्हेन्यूतील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याचबरोबर या दौऱ्यात ममता बॅनर्जी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही भेटणार आहेत.

पंतप्रधानांना भेटल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यावरच त्यांनी पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. पंतप्रधान कालिकुंडाला गेले. आम्ही व्यक्तिशः भेटलो नाही. हा आमचा शासकीय दौरा होता. या भेटी दरम्यान त्यानी कोविड लसीकरणासंबंधीही त्यांच्याशी चर्चा केली. आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात लस कमी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर पंतप्रधानांकडून आपण यावर नक्की विचार करु, असे उत्तर दिल्याचे यावेळी ममता बॅनर्जी यांनी नमुद केले. बंगाल विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता राष्ट्रीय राजकारणातही तिचे पाय मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी मोर्चा एकत्र करण्यासाठी संबंधात ममता दिल्लीत गेल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र करण्याच्या त्या विचारात आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com