Manipur Clashes Saam Tv
देश विदेश

Manipur Clashes: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, शाळेबाहेर महिलेची गोळ्या झाडून हत्या

Manipur Women Shot Dead: काही अज्ञातांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली.

Priya More

Manipur News: मणिपूरमधील हिंसाचार (Manipur Clashes) थांबायचे नाव घेत नाहीये. गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. अजूनही अनेक भागांमध्ये सतत हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. कधी गोळीबार, तर कधी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. अशामध्ये मणिपूरमध्ये शाळेच्या बाहेर एका महिलेची हत्या (Woman Shot Dead) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी इंफाळच्या (imphal) पश्चिम जिल्ह्यामध्ये एका शाळेबाहेर महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही अज्ञातांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. शाळेच्या बाहेर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एखच खळबळ उडाली आहे. इंफाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ही महिला शिशु निकेतन शाळेच्या बाहेर उभी होती. त्याच वेळी त्याठिकाणी आलेल्या अज्ञात तरुणांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या.

मृत महिला कोण आणि कोणत्या समूदायाची आहे हे अद्याप समजू शकले नाही. महिलेची हत्या करुन आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद होत्या. आता शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्याच्या एका दिवसानंतर शाळेच्या बाहेरच एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

मणिपूर सरकारने बुधवारी सांगितले की, 'शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून राज्यातील इंटरनेट सेवांवरील बंदी पाच दिवसांसाठी वाढवण्यात आली ​​आहे. आता मणिपूरमध्ये 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. 3 मे रोजी वांशिक समुदायांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर प्रशासनाने राज्यात इंटरनेट सेवांवर बंदी घातली. इंटरनेट सेवांवरील बंद ही वेळोवेळी वाढवण्यात आली आहे. आता आणखी ५ दिवस ही बंदी वाढवण्यात आली आहे.

मणिपूर राज्यातील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वादामध्ये सुमारे 120 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 3,000 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. मेईती समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी राज्यातील 3 डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आला तेव्हा पहिल्यांदाच हिंसाचार झाला. मणिपूरच्या 53 टक्के लोकसंख्येचा मैतेई समुदायाचा समावेश आहे आणि त्यातील बहुतेक लोक इंफाळ खोरियातमध्ये राहतात. नाग आणि कुकी हे आदिवासी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

SCROLL FOR NEXT