Mumbai Crime News: 11 लाखांवर गुलाब जल आणि अत्तर शिंपडलं, अगरबत्ती लावली, घरात अंधार केला अन् पैसे घेऊन मांत्रिक झाला पसार

Mantrika Cheated The Young Man: याप्रकरणी ओशिवरा पोलीस (Oshiwara Police) ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: पैसे दुप्पट (Double Money) करण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूनक झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच घटना आता मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये घडली आहे. जोगेश्वरी पश्चिमेला राहणाऱ्या एका तरुणाची पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली तब्बल 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस (Oshiwara Police) ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime News
MNS-Shivsena Alliance: मनसे-ठाकरे गट एकत्र येणार? युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, अमीर शेख या जोगेश्वरीतील ऑटो मेकॅनिकला त्याचा मित्र शमशुददीन शेखने फोन करून पैसे डबल करून देणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली. पैसे दुप्पट करण्यात तुला इंटरेस्टेड आहे का? अशी त्याने विचारणा केली. जवळचा मित्र सांगतोय त्यामुळे अमीरने मित्राला होकार दिला. त्यानंतर त्याने आपली गावाकडची वडीलोपार्जित जमीन विकून सहा लाख रुपये आणले. त्यानंतर त्याने व्याजाने पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर 2 जुलै रोजी भाऊ अस्लाम शेख याला घेऊन तो खारला पोहचला आणि मित्र शमशुददीन शेखला फोन केला.

Mumbai Crime News
Shivraj Singh Chouhan: महाराष्ट्रातील अनेक उद्योगांनी मध्यप्रदेशात येण्याचं आश्वासन दिलं; CM चौहान यांचा मोठा दावा

शमशुददीन शेख याने त्याच्या ओळखीतील युसुफ शेख, साजीद उर्फ सलीम, जुनेद आणि समीर सय्यद याची ओळख करून दिली. या भेटीदरम्यान पुन्हा सात वाजता भेटण्याचे जुनेद याने सांगितले. मात्र तो पुन्हा आला नाही. दुसऱ्या दिवशी शमशुददीन शेख या सर्वांना घेऊन संध्याकाळी सहा वाजता जोगेश्वरी येथे आला. पैसे दुप्पट करून घेण्यासाठी एका बॉक्स, कुलुप, फुले, अगरबत्ती, गुलाब जल, अत्तर घेऊन याव लागेल असे त्यांनी अमीरला सांगितले. सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू अमीर घेऊन आला. त्यानंतर त्यांनी अमीरला पैसे घेऊन शमशुददीन याच्या राहत्या घरी यायला सांगितले.

Mumbai Crime News
Madhya Pradesh Pravesh Shukla Case: तरुणावर लघवी प्रकरण! अटकेनंतर भाजप नेता प्रवेश शुक्लाच्या घरावर प्रशासनाने चढवला बुलडोझर, VIDEO आला समोर

त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमीर शेख हा 11 लाख रुपये घेऊन शमशुद्दीनच्या घरी आला. त्याने आपल्या भावालासुद्धा सोबत आणले होते. त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना बाहेर काढल्यानंतर समीर सय्यद याने गुलाबाच्या पाकळया बॉक्समध्ये टाकल्या आणि त्याच्यावर गुलाब जल शिंपडले. त्यानंतर त्याने 11 लाख रुपये बॉक्समध्ये ठेवण्यास सांगितले. अमीरने सोबत आणलेले पैसे बॉक्समध्ये ठेवले. त्यानंतर घरामध्ये अंधार करून अनोळखी मुल्ला मंत्राचे जप करू लागला.

त्यानंतर पैसे डबल होतील तोपर्यंत परवेज यांच्या घरी वरच्या मजल्यावर बसायला सांगितले. त्यादरम्यान जुनेद आणि एक अनोळखी मुल्ला यांनी 11 लाख रुपये पेटीतून काढून घेतले. भारतीय बच्चों की बँक या मनोरंजन बँकेचे लहान मुलांचे खेळण्यातील नोटा बॉक्समध्ये ठेवल्या. त्यामधील एक नोट काढून त्या पैशाची एक चादर दर्ग्यावर चढवण्यास सांगितले. आता हे बॉक्स तीन दिवस उघडायचे नाही असे सांगून ते नमाज पठणासाठी निघून गेले.

Mumbai Crime News
Pune Crime News: पैसे उधार न दिल्याने दुकानात घातला होता राडा; पोलिसांनी भरचौकातून काढली धिंड!

संशय आल्याने अमीरने तो बॉक्स खोलून पाहिला. तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. भारतीय बच्चों की बँक या मनोरंजन बँकेचे लहान मुलांचे खेळण्यातील नोटांचे 9 बंडल त्याला या बॉक्समध्ये दिसले. या बॉक्समध्ये अमीरने ठेवलेली एकही नोट नव्हती. त्यामुळे आपली फसवणू झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले. इतकी मोठी रक्कम ती सुद्धा गावची जमीन विकून आणि कर्ज घेऊन त्याने आणली होती. तेच पैसे गेल्यामुळे अमीर कंगाल झाला. या घटनेमुळे त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने थेट ओशिवरा पोलीस ठाणे गाठले आणि चारही आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अमीरच्या तक्रारीवरुन आरोपींविरोधात भादवि कलम 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com