WHO IS AJINKYA SHINDE? CJP PROTEST LEADER'S ALIBAG CONNECTION saam tv
देश विदेश

अभिजीत दिपकेनं ज्याच्यावर जंतरमंतरवरील CJP आंदोलनाची धुरा सोपवली तो अजिंक्य शिंदे कोण? अलिबाग कनेक्शन आलं समोर

Who Is Ajinkya Shinde? CJP संस्थापक अभिजीत दीपके यांच्या अटकेनंतर आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोण आहेत अजिंक्य शिंदे? जाणून घ्या त्यांचे अलिबाग आणि आम आदमी पार्टीशी असलेले कनेक्शन.

Omkar Sonawane

केंद्रीय निवडणूक आयोगाचा अंतर्गत कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण पेटले आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथे पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते, अभिजीत दीपके यांचे विमान दिल्लीमध्ये लँड होताच पोलिसांच्या पथकाने विमानात जाऊन दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यांना तातडीने एका बसमधून अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले होते.

CJP च्या तिन्ही नेत्यांना अटक केल्याने दिल्लीत आज होणाऱ्या जंतर-मंतर येथील CJP चे आंदोलनाचे पुढे काय होणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ जारी करत आता आंदोलनाची धूरा ही अजिंक्य शिंदे हे सांभाळातील असे सांगितले. दिल्ली पोलिसांनी मला, आशुतोष रांका, सौरव दासला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर अजिंक्य शिंदे हा आंदोलनाचे नेतृत्व करेल.आमच्या तिघानंतर आंदोलनाची सूत्रे तो सांभाळेल.

अजिंक्य शिंदे कोण आहे?

अजिंक्य शिंदे हे कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत. CJP मध्ये अजिंकीब शिंदे यांनी आम आदमी पार्टीच्या युवा संयोजकपदी कामकाज पाहिले. तसेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपच्या प्रमुख नेत्यांसोबत फोटोही शेअर केले आहे.

अजिंक्य शिंदे याचे अलिबाग कनेक्शन समोर

अभिजित दिपके यांच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाचे नेतृत्व सांभाळणारे अजिंक्य शिंदे यांचे अलिबाग कनेक्शन समोर आलं आहे. अजिंक्य यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आई वडील दोघेही अलिबागमध्येच राहतात. ते कामानिमित्त पुण्याला गेल्याचं सांगण्यात आलं असून अजिंक्य या आंदोलनाचे नेतृत्व सहज पेलेल असे त्याच्या आपमधील जुन्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP च्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'फॉर्म ७' च्या नियमांत सुधारणा

Maharashtra News Live Update: मुंबईमधील आंदोलनात CJP च्या समर्थकांची धरपकड

Home Hacks : प्लॅस्टिकची बादलीवरील खार्‍या पाण्याचे डाग काढण्याचे सोपे घरगुती उपाय

5 Gram Gold Mangalsutra Designs: महिलांसाठी 5 ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाइन्स, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

Heart Patient Walking: हार्ट पेशंट्सनी रोज किती पावले चालावे? जाणून घ्या चालण्याचे फायदे आणि घ्यायची काळजी

SCROLL FOR NEXT