Abhijit Dipke challenges PM Narendra Modi over CJP arrests saam tv
देश विदेश

आंदोलन केल्यानं दास, रांकांना 5 दिवसांची कोठडी, CJPचे नेते तिहारमध्ये, आता दिपके काय करणार?

CJP vs Government: CJPचे नेते तिहार जेलमध्ये असताना दुसरीकडे दिपकेंनी थेट पंतप्रधानांनाच आव्हान दिलयं... दिपके नेमकं काय म्हणाले? इंडिया आघाडी CJPच्या समर्थनार्थ कशी एकत्र आलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर विनापरवानगी आंदोलन करून तिरंगा फडकवल्याप्रकरणी CJPचे आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दोघांची रवानगी थेट तिहार जेलमध्ये करण्यात आलीय...तर दुसरीकडे, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप ठेवत अजिंक्य शिंदेची हमी पत्रावर सुटका करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर CJPचे संस्थापक अभिजित दिपके चांगलेच आक्रमक झालेत..."पंतप्रधानांनी हिंमत दाखवून देशामध्ये अधिकृतपणे आणीबाणी जाहीर करावी," असं उघड आव्हानच दिपकेंनी दिलयं...

दरम्यान दिपकेंनी इंडिया आघाडीचा आणि आमचा मुद्दा सारखाच असल्याचं सांगितल्यानंतर राहुल गांधींनीही CJPच्या कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय... तिरंगा फडकावणं हा गुन्हा कसा होऊ शकतो? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय...

CJPच्या समर्थनात राहुल गांधी

शांततापूर्ण निदर्शनादरम्यान जंतरमंतरवर तिरंगा फडकवणं हा कुठलाही गुन्हा नाही. त्यासाठी तरुणांना तुरुंगात टाकणं हे अत्यंत भ्याडपणाचं कृत्य आहे. विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि इंडिया आघाडी... बॅनर्स वेगवेगळे असू शकतात, पण उद्देश एकच आहे.

दुसरीकडे, ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या अटकेवरून RSS केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय... "नेहमी तिरंग्यासाठी आंदोलनाची भाषा करणारा संघ आता कुठे गायब आहे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय... तर तिरंगा फडकवायला माझ्यासोबत या, असं आव्हान नवनाथ बन यांनी राऊतांना दिलं...

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर रांका आणि दास यांची तिहार जेलमध्ये झालेली रवानगी, त्यावर विरोधकांनी दाखवलेली एकजुट पाहता... ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आणि इंडिया आघाडी एकत्र आंदोलन पुकारणार की काय याची चर्चा आता रंगू लागलीय. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे रांका आणि दास यांच्या सुटकेनंतर दिपके आंदोलन पुढे कसं नेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँकेतील हिस्सेदारी विकणार,कोणत्या कंपनीसोबत झाला 52,877 कोटींचा करार?

Cold Drinks Facts : कोल्ड्रिंक्सची बाटली उघडताच बुडबुडे का येतात? ९०% लोकांना माहिती नाहीत ही कारणे

Maharashtra News Live Update: - प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांची आजही झाली चौकशी

दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत, संपूर्ण मदत कधी मिळणार? स्पेशल रिपोर्ट

Aadhaar-PAN मध्ये तुमचा पत्ता बदलायचा आहे का? घरबसल्या असं करा अपडेट

SCROLL FOR NEXT