CJP PROTEST: ABHIJEET DIPKE DETAINED, AJINKYA SHINDE LEADS JANTAR MANTAR MOVEMENT saam tv
देश विदेश

ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, CJPचे प्रमुख नेते ताब्यात, अंजिक्य शिंदेंकडे नेतृत्व

Ajinkya Shinde Takes Charge as CJP Continues: CJPनं पुन्हा जंतरमंतरवर हल्लाबोल केलाय. मात्र दिल्लीत पोहचण्यापूर्वीच दिपकेंसह सीजेपीच्या नेत्यांना विमानातून अटक केली. यावेळी नेमका काय हायहोल्टेज ड्रामा झाला? आता आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार? काय आहे पुढील रणनीती पाहूयात हा रिपोर्ट........

Rohit Kadam

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधानानंतर आता ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJPनं पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं. जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी एकाच विमानातून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका दिल्लीकडे निघाले होते. मात्र दिल्लीत विमान लँड होताच मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. दिल्ली पोलिसांनी आपल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना विमानात घुसवून या तिघांना ताब्यात घेतलं. यावेळी दिपके आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली...(थोडा अँबियंस सोडा)...यावेळी अभिजीत दिपके काय म्हणाले पाहूयात....

यानंतर या तिघांना पोलिसांनी अज्ञात स्थळी नेलं. मात्र अटक होणार असल्याचा अंदाज दिपकेंनी आधीच व्यक्त केला होता. त्यामुळे अटकेनंतर आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे सांभाळणार असल्याची घोषणा करणारा व्हिडिओ दिपकेंनी अटकेनंतर रिलीज केला. त्यानंतर लगेचच अंजिक्य शिंदेंनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.

आंदोलनाचं नेतृत्व अंजिंक्य शिंदेंकडे आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.

मुळात सीजेपीचं जंतर मंतरवरील आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक दिवस आधीच दिल्लीत कमालीची तटबंदी केली. जंतरमंतरकडे येणाऱ्या रस्त्यांवर खिळे ठोकले. तर बॅरिकेड्सना साखळीनं बांधून जमिनीत कुलूपं ठोकलं. दिल्लीच्या रस्त्यांवर तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त पोलील आणि निमलष्करी जवान तैनात करण्यात आले. आंदोलकांची कोंडी करण्यासाठी देशभरातून दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. तर दिल्लीतील अनेक मेट्रो गाड्याही रद्द करण्यात आल्या. मात्र सीजेपीच्या आंदोलकांनी जमेल तसं जमेल त्या मार्गानं दिल्ली गाठली आणि आपला आवाज बुलंद कऱण्याचा प्रयत्न केला. दिवसभरात तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र तरीही सीजेपीच्या आंदोलनाची धग काही कमी झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन आता कधीपर्यंत चालणार? दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bathroom Mirror Benefits: बाथरूममध्ये आरसा असण्याचे फायदे काय? जाणून घ्या

10K Steps vs Cardio: १० हजार स्टेप्स चालणे की ३० मिनिटे कार्डिओ? वजन कमी करण्यासाठी कोणती उपाय आहे बेस्ट?

काँग्रेस सोमावारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; केंद्र सरकार बरखास्त करण्याची गरज-राहुल गांधी

जंतर मंतरवर राजकीय नेत्यांची धरपकड; 4 माजी मुख्यमंत्री दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमधील धक्कादायक घटना; 22 मृत रुग्णांवर 6 वर्षानंतर उपचार; 3 हॉस्पिटल्सनं शासनाला लावला 2 कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT