Abhijit Dipke reveals Cockroach Janata Party's next protest strategy 
देश विदेश

केंद्र सरकारला घेरण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचा नवा प्लॅन काय? दिपकेंनी सांगितली पुढची रणनीती

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या सुटकेनंतर सीजेपीच्या पुढील आंदोलनाच्या रणनीतीची चर्चा सुरू झालीय.अटक आणि ताब्यात घेण्याच्या घटनांनंतरही माघार घेणार नसल्याची भूमिका दीपके यांनी मांडलीय.

Bharat Jadhav

  • दीपके यांच्या सुटकेनंतर पुढील रणनीतीची चर्चा सुरू झाली

  • सीजेपीचे आंदोलन 2.0 पोलिसांनी रोखलं.

  • केंद्र सरकारला घेरण्यासाठी सीजेपीची पुढील रणनीती काय?

'कॉक्रोच जनता पार्टीच्या २.० आंदोलन पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सरकारला घेरण्यासाठी नवीन रणनीती आखत आहेत. दीपके यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी याबाबत घोषणा केलीय. गेल्या काही दिवसांत झालेल्या अटक आणि ताब्यात घेण्याच्या घटनांवरून स्पष्ट होतं की, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. "आम्ही घाबरणारही नाही आणि माघारही घेणार नाहीत,"अभिजित दीपके ठामपणे सांगितलं, त्याचवेळी दीपकेंनी पुढील रणनीती सांगितली.

पक्षातील इतर दोन प्रमुख व्यक्ती सौरव दास आणि आशुतोष रांका यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतरच 'कॉक्रोच जनता पार्टी'आपली पुढील दिशा ठरवण्यात येईल, असं दीपकेने सांगितलंय. दरम्यान सौरव दास आणि आशुतोष रांका सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जंतरमंतर येथे अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

अभिजित दीपके यांनी रविवारी सांगितले की, सौरव आणि आशुतोष रांका परत आल्यावर हा गट एकत्र बसून भविष्यातील रणनीती ठरवली जाणार आहे. "ही एक प्रदीर्घ लढाई आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. सौरव आणि आशुतोष आज सुटतील. ते काही कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती दीपकेंनी दिली.

याआधी १३ ऑक्टोबर रोजी सीजेपीच्या १४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यात सौरव दास, आशुतोष रांका यांचाही समावेश होता. आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतरवर मनाई करण्यात आलीय. जंतर-मंतरला आंदलोनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. तरीही सीजेपीचे कार्यकर्ते तेथे आंदोलनासाठी करू लागले होते. कार्यकर्त्यांवर कनॉट प्लेस आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या विरोधात अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या मोहिमेला 'CJP 2.0' असे नाव दिले होते. मात्र आता पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे या चळवळीच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. शुक्रवारी कनॉट प्लेस येथे CJP द्वारे आयोजित 'लहरा दो तिरंगा' आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील झंडेवालान येथील आपल्या घरातून बाहेर पडताच दीपके यांना ताब्यात घेण्यात आले होते. १० ऑक्टोबर रोजी त्यांनी स्वाक्षरी केलेल्या 'शांतता बंधना'चे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.

माचिस बॉक्स दान करण्याचे फायदे काय? आयुष्यात शुभ की अशुभ घडतं? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Maharashtra : राज्यात गुन्ह्यांचा ट्रेंड बदलला! दररोज ८ ते १० हजार तक्रारी

Fact Check: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीला तुकाराम मुंढेंचा पाठिंबा?

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT