ABHIJIT DIPKE CONTROVERSY: COMPLAINT FILED WITH DELHI POLICE AFTER NEET PROTEST Saam Tv
देश विदेश

Abhijeet Dipke : "...तो पाकिस्तानी एजंट" अभिजित दीपिकेला अटक करा, प्रसिद्ध इंफ्लुएन्सरने केली पोलिसात तक्रार

Abhijeet Dipke Controversy : नीट पेपरफुटी आंदोलनानंतर CJP संस्थापक अभिजित दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. फैजान अन्सारी यांनी गंभीर आरोप करत एफआयआर आणि अटकेची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • नीट पेपरफुटी आंदोलनानंतर CJP संस्थापक अभिजित दीपके चर्चेत

  • दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल

  • फैजान अन्सारी यांनी गंभीर आरोप करत एफआयआर आणि अटकेची मागणी केली

नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके चांगलेच चर्चेत आले. दरम्यान आंदोलन यशस्वी झाल्यानंतर CJP बद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशातच आता अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी ही तक्रार सादर करत दीपके यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

डीसीपी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना फैजान अन्सारी यांनी दावा केला की, दीपके यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावर दोन वेळा हल्ला करण्यात आला असून त्यासंदर्भातील पुरावे त्यांच्या जवळ आहेत. पुणे आणि औरंगाबाद येथे झालेल्या या कथित हल्ल्यांबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडेही गुन्हे दाखल केल्याचे सांगितले.

तक्रारीमध्ये अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यात त्यांना पाकिस्तानी एजंट तसेच उमर खालिद यांचे समर्थक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच जंतर-मंतर येथील आंदोलनासाठी काही बॉलिवूड सेलिब्रिटींना पैसे देऊन बोलावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांना कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

फैजान अन्सारी यांनी दीपके यांच्याविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास देशातील वातावरण बिघडू शकते, असा दावाही केला. तसेच काही सेलिब्रिटींना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आर्थिक मोबदला देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तथापि, या दाव्यांबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा संबंधित व्यक्तींची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच अभिजीत दीपके यांनीही या आरोपांवर भूमिका मांडलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा–रायपूर रोडवर मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

Film Producer : 'वॉन्टेड' चित्रपटाच्या निर्मात्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, धक्कादायक कारण आले समोर

Morning swollen feet: सकाळी उठल्यावर तुमचेही पाय सुजतात का? शरीर देतंय 'या' गंभीर आजारांचे संकेत

Mumbai Police : महाराष्ट्रात खळबळ, मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा वेतन घोटाळा, बोगस पोलिसांच्या नावे कोटींवर मारला डल्ला

Chocolate Waffle Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी खाण्याची इच्छा आहे? झटपट घरच्या घरी बनवा चविष्ट चॉकलेट वॉफल

SCROLL FOR NEXT