CJP Chalo Sansad Protest 
देश विदेश

Chalo Sansad Protest: CJPचे 'चलो संसद' आंदोलन पेटले, आंदोलकांवर लाठीचार्ज अन् अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाहा PHOTO

CJP Chalo Sansad Protest: CJP च्या 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. जंतर-मंतरवरून संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केले आहे.

Shruti Vilas Kadam
CJP Chalo Sansad Protest

'चलो संसद' आंदोलनाची घोषणा

कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या कार्यकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसदेकडे 'चलो संसद' मोर्चा काढला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.

CJP Chalo Sansad Protest

दिल्लीत कडेकोट सुरक्षा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संसद परिसर, जंतर-मंतर आणि महत्त्वाच्या मार्गांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. काही ठिकाणी बॅरिकेड्सही लावण्यात आले.

CJP Chalo Sansad Protest

पोलीस कारवाई

आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याचा आरोप CJP ने केला.

CJP Chalo Sansad Protest

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आंदोलनकर्त्यांनी नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

CJP Chalo Sansad Protest

सोनम वांगचुक, अभिजीत दिपके आंदोलनाच्या केंद्रस्थानी

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी CJP चे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र झाले.

CJP Chalo Sansad Protest

सरकारशी चर्चा

CJP च्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी CJP च्या सौरभ दास यांनी सरकारशी चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडण्यात आले. पण, २ तास थांबवून १० मिनिटे चर्चा झाल्यांने आंदोलक आणखी संतप्त झाले आहेत.

CJP Chalo Sansad Protest

राजकीय वातावरण तापले

संसद अधिवेशन सुरू असतानाच या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिक्षण व्यवस्था, परीक्षा घोटाळे आणि सरकारी उत्तरदायित्व या मुद्द्यांवर विरोधकांनीही सरकारवर दबाव वाढवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाचे नवे नोटिफिकेशन जारी, मुंबईत महत्त्वाची बैठक

Mumbai Flyover: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! नवीन उड्डाणपूल लवकरच होणार सुरू, कुणाला होणार फायदा?

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT