Abhijeet Dipke News Saam tv
देश विदेश

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांना मारहाण; अज्ञात व्यक्तीने कानशिलात लगावली, VIDEO

Abhijeet Dipke News update : कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांना मारहाण झाल्याची घटना समोर आलीये.

Vishal Gangurde

अभिजीत दीपके यांना मारहाण

दीपकेंना मारहाण झाल्याने घटनास्थळी गोंधळ

मारहाणीनंतर तरुणांनीही अज्ञात तरुणाला केली मारहाण

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दीपके यांना जयपूरमध्ये मारहाण झाली. एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची माहिती हाती आली आहे. मारहाणीनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपर फुटीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीवरून देशातील विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. कॉकरोच जनता पार्टीने सर्वात प्रथम आंदोलन दिल्लीच्या 'जंतर मंतर' मैदानात केलं. काही दिवसांपूर्वी पुण्यातही आंदोलन केलं. त्यानंतर अभिजीत दीपके हे राजस्थानच्या जयपूरमध्ये आंदोलनासाठी पोहोचले होते. या आंदोलनासाठी शेकडो तरुणांनी हजेरी लावली होती. या आंदोलनातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

आंदोलनस्थळी अभिजीत दीपके यांचं जंगी स्वागत झालं. तरुणांकडून आंदोलनस्थळी खांद्यावरून नेताना एका अज्ञात तरुणाने अभिजीत दीपके यांना मारहाण केली. मारहाणीनंतर तातडीने संबंधित तरुणाला घेरलं. त्यानंतर काही तरुणांनी दीपकेंना मारहाण करणाऱ्याला तरुणाला मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेनंतर आंदोलनस्थळी गोंधळाचं वातावरण झालं. अज्ञात तरुणाच्या मारहाणीनंतर अभिजीत दीपके यांनीही तरुणांना संयमाचा सल्ला दिला. दीपके यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अभिजीत दीपके यांच्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. धमकी मिळाल्यानंतर विविध ठिकाणी दीपके आंदोलन करताना दिसत आहे. या आंदोलनादरम्यानच जयपूरमध्ये अभिजीत दीपके यांना मारहाण झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच दीपके यांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT