Ukraine Crisis: What happened Bro? Jyotiraditya Scindia questioning to students in Marathi Twitter/@ANI
देश विदेश

Ukraine Crisis: "काय झालं तुम्हाला बाबा?" - ज्योतिरादित्य सिंधियांकडून विद्यार्थ्यांची मराठीतून विचारपूस (पहा Video)

Jyotiraditya Scindia In Romania: नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुखारेस्ट (रोमानिया) येथील हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुखारेस्ट, रोमानिया: रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia - Ukrain War) केल्यानंतर युक्रेमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा लॉन्च केलं आहे. या मिशन अंतर्गत शेकडो भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आलंय. बुधवारीदेखील काही भारतीयांना युक्रेनमधून (Ukraine) सोडवण्यात आलं. रोमानिया देशातील बुखारेस्ट (Bucharest Romania) येथील हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Henri Coandă International Airport) काही भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यात आले. यावेळी विमानतळावर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे देखील उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांची विचापूस केली असता त्यातला एक विद्यार्थी हा महाराष्ट्रातून होते, तेव्हा मंत्री सिंधिया यांनी त्याच्याशी थेट मराठीतून बोलण्यास सुरुवात केली आणि त्याची विचारपूस करत मदतीचे आश्वासन दिले. (Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia interacts with Indian students at Henri Coandă International Airport in Bucharest Romania)

हे देखील पहा -

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुखारेस्ट (रोमानिया) येथील हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याला त्यांनी "कहा से हो भाई" असं विचारलं असता विद्यार्थ्याने उत्तर दिलं की, मी महाराष्ट्रातून आहे. तेव्हा सिंधीया म्हणाले की मराठीमध्ये (Marathi) बोला ना बाबा, काय झालं तुम्हाला? किती वेळ झाला तुम्हाला ईथे? तुम्ही युक्रेनमध्ये कुठे होता? असं विचारत त्यांना स्वतः त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा मास्क व्यवस्थित केला.

पुढे सिंधीया यांनी विचारलं की, "यांनी तुमचा ख्याल (काळजी) ठेवला ना?" तेव्हा त्या विद्यार्थ्यांने उत्तर दिलं की होय, आमची खूप काळजी घेतली. यावर ज्योतिरादित्य विद्यार्थ्याला म्हणाले सिंधिया की, तुम्ही सुरक्षित जा, आणि घरी सांगा - "पंतप्रधांचा विशेष आग्रह होता की, इथे येऊन प्रत्येकाला सुरक्षित पाठवलं जावं" सिंधीयांनी यावेळी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मदतीचं आश्वासन दिलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT