Rahul gandhi  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? केंद्र सरकार उत्तर देणार, कोर्टात काय युक्तिवाद झाला?

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरील याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. याबाबतचा एक अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यास सांगितला आहे.

Vishal Gangurde

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरून वाद निर्माण झालाय. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर अलाहाबाद हायकोर्टातील लखनौ खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्टाने केंद्र सरकारला १० दिवसात राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत अहवाल स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.

अलाहाबाद कोर्टात सोमवारी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर सुनावणी झाली. कोर्टाने केंद्र सरकारला १० दिवसांत राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्राने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत केंद्र सरकारला सवाल केला आहे.

सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने अहवाल सादर केला. मात्र, कोर्टाने या अहवालास अर्धवट असल्याचे म्हटलं. याचिकेत म्हटलं की, 'राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत संशय आहे. याच आधारावर त्यांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आलं आहे. हायकोर्टाने या याचिकेला गांभीर्याने घेतलं आहे. कोर्टाने केंद्र सरकारला लवकरात लवकर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की, 'राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा सुनावणीचा निकाल लागल्यास त्यांचा खासदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. काँग्रेसचं म्हणणं आहे की, 'हे राजकीय षडयंत्र आहे. या याचिकेच्या आडून विरोधकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT