चिनी रॉकेट सिस्टिमचा फायर दरम्यान स्फोट
कंबोडियाच्या ८ जवानांचा मृत्यू
थायलंड-कंबोडिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घटना
चले तो चाँद तक नही शाम तक असं चिनी वस्तूंबाबत म्हटलं जातं. ती गत चीन शस्त्रास्त्रांबाबत होताना दिसत आहे. चिनी शस्त्र काय दर्जाची आहेत, हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता थायलंड-कंबोडिया युद्धादरम्यान चिनी रॉकेट सिस्टिमचा फायर वेळीच भीषण स्फोट झालाय. या अपघातात कंबोडियाच्या तब्बल ८ सैनिकांना आपला जीव गमवावा लागलाय.
सोशल मीडियावर थायलंड-कंबोडिया युद्धाचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कंबोडियन सैनिक चीननिर्मित 'मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम' (MLRS) च्या सहाय्याने थायलंडच्या दिशेने रॉकेट डागताना दिसत आहेत. यंत्रणेतून एकापाठोपाठ एक असे सहा रॉकेट डागले गेले. पण त्यानंतर अचानक या रॉकेट सिस्टिमचा स्फोट झाला. भीषण स्फोटात कंबोडियाच्या ८ जवानांचा मृत्यू झाला. दरम्यान चीनने ८० च्या दशकात रशियन 'BM-21 ग्रॅड'ची कॉपी करून 'PHL-८१' या नावाने ही सिस्टिम तयार केली होती.
कंबोडियाने युद्धाच्या सुरुवातीलाच या रॉकेट सिस्टिमसंदर्भात थायलंडला धमकी दिली होती. मात्र प्रत्यक्षात युद्धभूमीवर ही सिस्टिम शत्रूवर तुटून पडण्याऐवजी कंबोडियाच्याच सैनिकांसाठी जीव घेणारी ठरली. चिनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानने वापरलेल्या चिनी एअर डिफेन्स सिस्टमला (HQ-9 आणि LY-८०) भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा साधा सुगावाही लागला नव्हता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.