Shravan Singh: कोण आहे १० वर्षीय श्रवण सिंह? ऑपरेशन सिंदूरमध्ये सैनिकांना चहा-पाणी अन् लस्सी पोहोचवली; राष्ट्रपतींकडून सन्मान

Who is Shravan Singh Help Indian Army During Operation Sindoor: १० वर्षीय श्रवण सिंगचा काल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरसाठी त्याने भारतीय सैन्याची खूप मदत केली होती.
Shravan Singh
Shravan SinghSaam Tv
Published On
Summary

ऑपरेशन सिंदूरमध्ये १० वर्षीय श्रवण सिंगचा मोलाचा वाटा

युद्धाच्या काळात सैनिकांना केली मदत

सैनिकांना लस्सी, चहा, ताक, बर्फ पुरवण्याचे केले काम

ऑपरेशन सिंदूर हे प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी अनेक सैनिकांनी देशासाठी निस्वार्थ होऊन काम केले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ऑपरेशन सिंदूरची तयारी केली. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमध्ये १० वर्षीय श्रवण सिंग यानेदेखील खूप मदत केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये मदत करणारा तो सर्वात लहान मुलगा होता.

Shravan Singh
Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

ऑपरेशन सिंदूरमध्ये १० वर्षीय श्रवण सिंगचा मोलाचा वाटा

१० वर्षीय श्रवण सिंग याला काल २६ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार दिला. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याने दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि कामगिरीसाठी त्याला सन्मानित करण्यात आले. एकीकडे भारत पाकिस्तानच्या सीमेवर युद्ध सुरु होते तर दुसरीकडे १० वर्षीय श्रवणने स्वतः चा विचार न करता सैनिकांची सेवा केली. त्यांना लस्सी आणि चहा अशा सर्व गोष्टी नेऊन दिल्या.ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे थोडा हातभार हा श्रवण सिंगचा आहे.

श्रवण सिंग कोण आहे? (Who is Shravan Singh Operation Sindoor)

श्रवण सिंग हा मूळचा पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील ममदोत गावातील रहिवासी. त्याचे गाव सीमेपासून जवळ आहे. त्यामुळे त्याने सैनिकांना खूप मदत केली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान युद्धामुळे अनेक जोखीम असतानाही त्याने सीमेवर चैनात सैनिकांना पाणी, चहा, दूध, बर्फ आणि लस्सी हे सर्व नेऊन दिले. श्रवणच्या या कामगिरीमुळे त्याना सन्मानित करण्यात आले.

Shravan Singh
Success Story : मुलासाठी आईने सरकारी नोकरी सोडली, चौथी फेल लेक झाला IRS अधिकारी, चौथ्या प्रयत्नात UPSC केली क्रॅक

श्रवणने काय सांगितले?

ऑपरेशन सिंदूरदरम्यान श्रवणने केलेल्या मदतीबद्दल माहिती दिली आहे. जेव्हा पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरु झाले. तेव्हा सैनिक आमच्या गावात आले. मला वाटले त्यांची सेवा करावी. मी त्यांच्यासाठी रोज दूध, चहा, ताक, बर्फ घेऊन जायचो. यासाठी पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद होतो. मी कधीही स्वप्नातही या गोष्टींचा विचार केला नव्हता, असं श्रवणने सांगितले.

Shravan Singh
Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com