Indo China Conflict X
देश विदेश

Indo China Conflict : पाकनंतर चिनी ड्रॅगनची कुरापत, भारतीय हद्दीत हेरगिरी जहाज

India China Conflict : पाकनंतर आता चीनी ड्रॅगनने भारताची कुरापत काढलीय... चीननं भारताच्या समुद्रात हेरगिरी सुरु केलीय.. त्याचा पुरावाच समोर आलाय.. मात्र चीनचं कोणतं जहाज हेरगिरी करतंय? चीनने यावर नेमकं काय म्हटलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असतानाच आता पुन्हा एकदा चीनी ड्रॅगनने भारताची कुरापत काढलीय... चीनच्या दा यांग यी हावो या हेरगिरी जहाजानं मलाक्काची सामुद्रधुनी पार करत थेट भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानं एकच खळबळ उडालीय... दा यांग यी हावो जहाजाच्या पलटणमध्ये 4 जहाजं असल्याचं समोर आलंय....त्यातील 3 जहाजं अरबी समुद्रात तर 1 जहाज बंगालच्या उपसागरात आढळून आलंय...मात्र या जहाजांचा भारताला कसा धोका आहे? पाहूयात....

भारताच्या हद्दीत हेरगिरी जहाज ?

- भारतीय हद्दीत 'दा यांग यी हाओ' हे चीनचं हेरगिरी जहाज

- क्षेपणास्त्र चाचण्या आणि नौदलाच्या जहाजांच्या हेरगिरीची शक्यता

- समुद्राच्या तळांचे नकाशे आणि पानबुड्यांचे आवाज रेकॉर्ड करु शकतं

- युद्ध भडकल्यास पानबुड्यांवर हल्ल्यासाठी माहितीचा वापर होण्याची शक्यता

- चीनकडून मात्र हे संशोधन जहाज असल्याचा दावा

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानवर थू थू करत असताना चीनने पाकिस्तानला पाठींबा दिला.....एवढंच नाही तर लष्करी मदतही केली...आत तर चीनचं जहाज भारताच्या समुद्र हद्दीत आढळून आलंय.. त्यामुळे भारतानं चहुबाजूंनी सावध राहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलीय...

खरंतर चीनने केलेली कुरापत ही पहिल्यांदाच झाली नाही... तर याआधीही चिनी ड्रॅगनची हेरगिरी करणारी जहाजं भारतीय समुद्रात आढळून आली आहेत....ती नेमकी कधी? पाहूयात...

- जुलै 2019

चीनचं 'शी यान 1' जहाजाची भारतीय हद्दीत घुसखोरी, भारताचा तीव्र आक्षेप

- ऑगस्ट 2022

चीनचं 'युवान वांग 5' जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर, भारताचा संताप

- नोव्हेंबर 2022

क्षेपणास्त्र चाचणीआधी 'युवान वांग 6' या जहाजाच्या हिंदी महासागरात हालचाली

- मार्च 2024

क्षेपणास्त्र चाचणीपुर्वी 'युवान वांग 3' च्या भारतीय हद्दीत हालचाली

आता चीनने 'दा यांग यी हावो' हे हेरगिरी जहाज नसून संशोधन जहाज असल्याचा दावा केलाय.. तर हा दावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.... त्यामुळं भारतानं फक्त पाकिस्तान आणि चीनी सीमेवरच नाही तर सागरी सीमांवरही डोळ्यात तेल घालून जागरुक राहण्याची गरज आहे.. कारण चिन्यांची पाठीत खंजीर खुपसण्याची जुनीच सवय आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT