Saam Tv
देश विदेश

चीन आणि तैवानमध्ये पुन्हा वाढला तणाव, लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या सागरी हद्दीत

चीन आणि तैवान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे.

साम वृत्तसंथा

तैपेई : चीन (China) आणि तैवान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेने तैपेईला 1 अब्ज डॉलर शस्त्रास्त्र पॅकेज जाहीर केल्याने पुन्हा तणाव वाढला आहे. या घोषणेनंतर चिनी लष्कराची 4 विमाने आणि नौदलाची पाच जहाजे तैवानच्या सागरी सीमा ओलांडल्या आहेत. तैवान संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आम्हाला दिसले की, 4 चिनी विमाने आणि पाच नौदलाची जहाजे आमच्या आसपास पोहोचली आहेत, असं या निवेदनात म्हटले आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या दोन लढाऊ विमानांनी तैवान सागरी सीमेजवळील मध्यरेषा ओलांडल्याचं म्हटलं होतं. संरक्षण मंत्रालयाने चीनच्या या कृत्यांवर नजर ठेवण्यासाठी हवाई गस्त सुरू केली आहे, तसेच नौदल जहाजे आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालींद्वारे परिस्थितीवर नजर ठेवली आहे. जेणेकरून चीनच्या कोणत्याही हालचालींना उत्तर देता येईल.

चीनसोबतच्या तणावादरम्यान तैवानची संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी अमेरिकेने 1.1 अब्ज डॉलरची आधुनिक शस्त्रे देण्याची घोषणा केली आहे. तैवानला देण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास सक्षम असलेल्या प्रारंभिक रडार चेतावणी प्रणालीसाठी 665 डॉलर दशलक्ष आणि 60 प्रगत हार्पून क्षेपणास्त्रांसाठी 355 डॉलर दशलक्ष किमतीचा करार आहे.

हार्पून क्षेपणास्त्रे कोणतेही लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटने तैवानला 60 जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि 100 हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रांसह 1.1 अब्ज डॉलरची लष्करी उपकरणे देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT