Xi Jinping President of China
Xi Jinping President of China  SAAM TV
देश विदेश

China News: सत्तेवर राहण्यासाठी Xi Jinping यांनी बदलला नियम! म्हणून तिसऱ्यांदा बनू शकले चीनचे राष्ट्रपती

Chandrakant Jagtap

Xi Jinping News : शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. शुक्रवारी अधिकृतपणे चीनच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदी जिनपिंग यांची निवड झाली. एका नेत्याची सलग तिसऱ्यांदा देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीपल्स पार्टी ऑफ चायनाची वार्षिक नॅशनल पीपल्स काँग्रेस गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याच नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली.

शुक्रवारी जिनपिंग यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. शुक्रवारीच जिनपिंग यांची चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाच्या अध्यक्षपदीही निवड झाली. राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर शी जिनपिंग सोमवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला संबोधित करणार आहेत. तर सोमवारी संध्याकाळीच ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने एक ड्राफ्ट प्लान सादर केला. त्यात कम्युनिस्ट पक्ष सरकारवर आपले थेट नियंत्रण वाढवणार आहे असे म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या वार्षिक काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांनी त्यांची नवीन टीमही निवडली होती. त्यात ली कियांग यांची चीनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ली शी, डिंग झ्युझियांग आणि काई क्यूई यांनाही स्थान देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सत्तेवर राहण्यासाठी नियम बदलला

शी जिनपिंग सत्तेवर येण्यापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष केवळ पाच वर्षांच्या दोन टर्म किंवा वयाच्या 68 व्या वर्षापर्यंत अध्यक्ष राहू शकत होते. परंतु 2013 मध्ये सत्तेवर आलेल्या शी जिनपिंग यांनी हा नियम रद्द केला. यामुळेच 69 वर्षांचे असलेले शी जिनपिंग यांची दोन टर्म यशस्वीरीत्या सेवा करून तिसर्‍यांदा अभूतपूर्व पद्धतीने देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली.

चीनच्या संसदेने नेतृत्वाला दिली मान्यता

चीनच्या संसदेने शुक्रवारी एकमताने शी जिनपिंग यांच्या अध्यक्ष आणि लष्करप्रमुख म्हणून पाच वर्षांच्या अभूतपूर्व तिसर्‍या कार्यकाळाला मान्यता दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT