China Corona Saam Tv
देश विदेश

China Corona Update : चीनमध्ये कोरोना साथीचा हाहाकार; देशातील ८० टक्के जनतेत कोव्हिडचा संसर्ग

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

China Corona Update : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि पाश्चिमात्य देशांच्या दाव्यानंतर अर्ध्याहून अधिक जनतेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चीनने मान्य केले आहे. 'देशातील ८० टक्के जनेला कोरोना संसर्ग झाल्याचे सरकारी चीनी शास्त्रज्ञाने मान्य केले. (Latest Marathi News)

चीनच्या (China) रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या माहितीनुसार, 'चीनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक फिरण्यास निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आणखी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही क्षेत्रात प्रचंड कोरोना (Corona) पसरण्याची शक्यता आहे. चीनी लूनर नवीन वर्षात नागरिकांना सुटी असते. त्यामुळे चीनी नागरिक त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास जातात'.

काही दिवसांपूर्वी चीनने त्यांची शून्य कोरोना धोरण रद्द करण्याच मोठा निर्णय घेतला. चीनने हे देखील मान्य केले आहे की, 12 जानेवारीपर्यंतच्या एका महिन्याच्या कालावधीत ६० हजार चीनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काही जाणकारांचं म्हणणं आहे की, चीनने आकडा कमी करू सांगितला आहे.

नुकताच एक अहवाल समोर आला आहे की, चीनमध्ये कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक यामुळे रुग्णालयात देखील दाखल झाले होते. चीन खरे आकडे लपवत असेल तर जागतिक आरोग्य संघटनेसाठी मोठं आव्हान झालं आहे.

कोरोना सारख्या संकटाशी सध्या चीन सामना करत आहे. त्यामुळे चीनच्या आर्थिक विकास दराचे आकडे समोर आले होते. चीनचा आर्थिक विकास दर ३ टक्के राहिला. कोरोनाच्या महामारीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असल्यामुळे आर्थिक विकास दरावर परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

'मी सगळं बाहेर काढेल, कोरोनामध्ये...'; 'तिकीटासाठी किशोरी पेडणेकरांकडून उद्धव आणि रश्मी ठाकरेंना धमकी; 'या' बड्या नेत्याचा दावा|VIDEO

Cholesterol symptoms on face: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसून येतात हे ५ प्रमुख बदल; वेळीच ओळखा लक्षणं

Savalyachi Janu Savali: भैरवी आणि सावली समोरासमोर येणार; 'सावळ्याची जणू सावली'मध्ये घडणार गौप्यस्फोट

Crime: महिला पोलिसावर ७ वर्षे गँगरेप, ड्युटी असल्याचे सांगून हॉटेलवर न्यायचे अन् ड्रग्ज द्यायचे; वरिष्ठ अधिकाऱ्यासह सहकाऱ्यांवर आरोप

SCROLL FOR NEXT