Rescue teams operate at the site of a deadly coal mine gas explosion in Shanxi, China, where 90 workers lost their lives. saam tv
देश विदेश

कोळशाच्या खाणीत मोठा स्फोट; 90 कामगारांचा होरपळून मृत्यू, जगात खळबळ

China Coal Mine Explosion 2026 Latest Update: चीनमधील शांक्सी प्रांतात कोळसा खाणीत भीषण गॅस स्फोट होऊन 90 कामगारांचा मृत्यू झाला. 200 हून अधिक मजूर बचावले असून काही अजूनही अडकले आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Omkar Sonawane

चीनमधील कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर चीनमधील शांक्सी येथे घडली असून हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी झाला. दुर्घटनेच्या वेळी 247 कामगार कंपनीमध्ये काम करत होते. सुरुवातीला 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर होती, मात्र आता मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून सदर ठिकाणी मृतांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहायला मिळत आहे.

बचावकार्यादरम्यान आज सकाळपर्यंत 201 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर 38 जण अजूनही खाणीमध्ये अडकलेले आहेत. खाणीत अडकलेल्या मजुरांपैकी काही मंजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी बचावकार्य अधिक गतीने आणि मोठ्या प्रमाणात राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमीवर तातडीने उपचार सुरू असून बचाव मोहीम राबवली जात आहे. या घटनेला जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चीनमधील तुलनेने गरीब प्रांतांपैकी एक असलेला शांक्सी हा देशाचा कोळसा उत्पादनाचा प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दशकांत खाण सुरक्षेत सुधारणा झाली असली तरी, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष आणि अपुरी अंमलबजावणी यामुळे अशा अपघातांच्या घटना अजूनही घडत असतात. या प्रांताची लोकसंख्या सुमारे 3 कोटी 40 लाख आहे. गेल्या वर्षी येथे लाखो कामगारांनी सुमारे 1.3 अब्ज टन कोळसा उत्पादन केले, जे चीनच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या जवळपास एक तृतीयांश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सलमान खान केसमध्ये अचानक मोठा ट्विस्ट; अनमोल बिश्नोईचा कोर्टात धक्कादायक दावा, खळबळजनक माहिती आली समोर

पावसाळ्यात ऑफिसला जाताना 'या' फॅशन टिप्स ठेवा लक्षात, दिवसभर दिसाल फ्रेश

Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडणं होईल बंद! फक्त करा 'हे' ७ सोपे उपाय

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये जुन्या कायद्यानुसार भूसंपादन करण्याची मागणी

Pune : पुण्यात पावसाचा कहर! अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना; कोणते मार्ग राहणार बंद? वाचा

SCROLL FOR NEXT