BEIJING PLANE CRASH: VIRAL VIDEO CLAIMS AIRCRAFT HIT CHINA'S TALLEST BUILDING saam tv
देश विदेश

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Beijing Plane Crash: विमान टॉवरच्या एका भागावर धडकले. यामुळे इमारतीच्या काही खिडक्या फुटल्या आणि धडकेनंतर विमानाचे तुकडे-तुकडे झाले.

Bharat Jadhav

  • बीजिंगमध्ये विमान सर्वात उंच इमारतीला धडकल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • व्हिडिओमुळे अनेकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

चीनची राजधानी बीजिंगमधील सर्वात उंच इमारत असलेल्या 'सिटिक टॉवर'ला (CITIC Tower) एक विमान धडकलंय. या घटनेत इमारतीचे मोठे नुकसान झाले आणि विमानाचे अवशेष जमिनीवर पडल्याचे दृश्य एका व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीजिंगच्या गुओमाओ भागात असलेली ही १०९ मजली इमारत 'चायना जून ' या नावानेही ओळखली जाते.

ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'च्या एका वृत्तानुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विमान टॉवरच्या एका भागावर आदळताना दिसत आहे. विमानाच्या धडकेमुळे इमारतीच्या दोन खिडक्या फुटल्या असून विमान आदळताच त्याचे दोन तुकडे झालेत. विमानाचे अवशेष जमिनीवर पडताना दिसत आहेत, तर खाली विखुरलेल्या ढिगाऱ्यातून धूर निघताना दिसत आहे.

या दुर्घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. न्यू एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार बिल्डिंगच्या आसपास मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. ये-जा करणाऱ्यांना या इमारतीचे फोटो काढण्यापासून किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापासून रोखले जातंय. मदत आणि बचाव कार्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी इमारतीभोवतालचे अनेक रस्तेही पूर्णपणे बंद केलेत.

एक इंजिन असलेलं विमानाची इमारतीला धडक

स्थानिक प्रशासनाने या अपघातातील जीवितहानीची संख्या अद्याप निश्चित केलेली नाही, तसेच विमानात असलेल्या व्यक्तींविषयीही कोणतीही माहिती दिलेली नाही. 'Flightradar24' च्या नोंदींवरून हे विमान 'Sunward SA60L Aurora' प्रकारचे होते. हे दोन सीट असलेलं विमान होतं.

हे चीनच्या 'स्टारएअर एअरक्राफ्ट कंपनी'ने तयार केलेले, दोन आसनी आणि एकेरी इंजिन असलेले हलके क्रीडा-विमान (light sports aircraft) आहे. बीजिंगमध्ये कोणतेही छोटे विमान उडवण्यासाठी 'नागरी उड्डाण प्राधिकरण' (Civil Aviation Authority) आणि 'चिनी हवाई दल' या दोघांचीही परवानगी घेणे आवश्यक असते.

बीजिंगने अलीकडेच आपल्या हवाई क्षेत्राबाबत अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. मनोरंजनाच्या उद्देशाने विमाने किंवा ड्रोनच्या अनधिकृत उड्डाणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. राजधानीच्या हद्दीत ड्रोन उडवणे, त्यांची विक्री करणे किंवा ते भाड्याने देणे यांवरही बंदी आहे. केवळ यानकिंग (Yanqing) जिल्ह्यालाच ड्रोनच्या चाचणीसाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies For Frequent Urination: वारंवार लघवी आल्याचा भास होतोय? लघवीची जळजळ कमी करण्यासाठी करा काकडीचा सोपा उपाय

IAS Transfer: 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

Health Tips - सकाळी उठल्याबरोबर किंवा जेवणानंतर लगेच चहा पिताय? तुमच्या या सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात

Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पुणे पोलिस दलात खळबळ

Maharashtra News Live Update: दिल्लीत CM फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

SCROLL FOR NEXT