देश विदेश

Child Accident Viral Video : भयंकर! ८ महिन्याच्या चिमुकल्याचं खिडकीत अडकलं मुंडकं...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

Ruchika Jadhav

Viral Video : लहान मुलांना नेहमीच डोळ्यात तेल घालून संभाळावं लागतं. लहान मुलं सतत अतरंगीपणा करतात. इकडे जाऊ नको असं म्हटलं तर ते मुद्दाम त्या ठिकाणी जातात. अशात सोशल मीडियावर एका हृदयद्रावक दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. (Baby Accident Video)

एक ८ महिण्यांच्या बाळाचा भयंकर अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ इमारती जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका लहान बाळाचं मुंडकं इमारतीच्या खिडकीमध्ये अडकलं आहे. तसेच हे बाळ उंचावर फक्त त्याच्या मुंडक्याने लटकलेलं दिसत आहे. त्रास होत असल्याने हे बाळ जिवाच्या आकांताने रडत आहे.

एवढी मोठी घटना घडूनही त्याच्या घरातील व्यक्तींना याची माहिती नसते. या कुटुंबातील व्यक्तींचे बाळाला संभाळण्यात दुर्लक्ष झालेले दिसत आहे. बाळ खिडकीत अडकून बराच वेळ मोठमोठ्याने रडत होतं. मात्र तरी देखील त्याच्या कुटुंबातील कोणालाही त्याचा आवाज येत नाही. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून खालच्या मजल्यावरील दोन मुलं खिडकीतून वर डोकावतात. तेव्हा त्यांना बाळ लटकल्याचे दिसते.

हे पाहून त्या दोघांच्याही पायाखालची जमिन सरकते. संपूर्ण शरीराचे वजन फक्त मुंडक्यावर अडकल्याने बाळाला खूप त्रास होत होता. तसेच यात त्याचा जीव गुदमरू लागला होता. त्यामुळे या दोन्ही मुलांनी बाळाच्या पायांना आधार देत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

शेवटी यातील एक मुलगा वरच्या मजल्यावर जाऊन कुटुंबीयांना सांगतो. त्यानंतर या बाळाला खिडकीमधून घरात घेतले जाते. बाळ सध्या सुखरूप असल्याचे समजले आहे. CCTV IDIOTS या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

SCROLL FOR NEXT