Justice UU Lalit next CJI
Justice UU Lalit next CJI SAAM TV
देश विदेश

Justice U U Lalit | न्या. यू यू ललित होणार पुढील सरन्यायाधीश; CJI एन. व्ही. रमणा यांनी केंद्राकडे पाठवली शिफारस

Nandkumar Joshi

Justice UU Lalit next CJI नवी दिल्ली: न्या. यू. यू. ललित हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. २६ ऑगस्ट रोजी देशाचे सध्याचे सरन्यायाधीश रमणा हे निवृत्त होत आहेत.

'तीन तलाक' (Triple Talaq) प्रथा अवैध ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांच्या प्रक्रियेत न्या. यूयू ललित यांचा सहभाग आहे. यूयू ललित हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांची थेट सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पीठात पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या आधी न्या. एस. एम. सीकरी मार्च १९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पीठात पदोन्नती मिळालेले पहिले वकील होते. ते जानेवारी १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश बनले होते.

न्या. ललित हे वर्तमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N V Ramana) हे सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश होतील. ललित यांची १३ ऑगस्ट २०१४ रोजी सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

न्या. ललित यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये सहभाग आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऑगस्ट २०१७ मध्ये ३-२ बहुमताने तीन तलाक हा असंवैधानिक घोषित केले होते. त्या तीन न्यायाधीशांमध्ये न्या. ललित यांचा समावेश होता.

न्या. यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने पॉक्सो अंतर्गत एका प्रकरणात 'त्वचेशी त्वचेचा संपर्क'संबंधी वादग्रस्त निकाल रद्दबातल ठरवला होता.

९ नोव्हेंबर १९५७ रोजी यू. यू. ललित यांचा जन्म झाला होता. जून १९८३ मध्ये वकील म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. डिसेंबर १९८५ पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती. जानेवारी १९८६ मध्ये दिल्लीत येऊन त्यांनी वकिली सुरू केली.

एप्रिल २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाद्वारे एक वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली गेली. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणात सुनावणीसाठी त्यांना सीबीआयचे विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्या. यू. यू. ललित हे ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT