विमानातच झाला कोरोना; महिलेला फ्लाईटच्या बाथरुममध्येच केलं ३ तास क्वारंटाईन... CNN
देश विदेश

विमानातच झाला कोरोना; महिलेला फ्लाईटच्या बाथरुममध्येच केलं ३ तास क्वारंटाईन...

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क: फ्लाइटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एका अमेरिकन महिलेला फ्लाइटच्या बाथरूममध्ये तीन तास क्वारंटाइन करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला शिकागोहून (Chicago) आइसलँडला (Iceland) फ्लाइटमध्ये (Flight) जात होती. या महिलेचं नाव मारिसा फोटोओ (marisa fotieo) आहे. तिने सांगितलं की, 19 डिसेंबर रोजी प्रवासादरम्यान तिचा घसा दुखू लागला. त्यानंतर तिने फ्लाईटच्या बाथरुममध्ये (Filghts's Bathroom) जाऊन रॅपिड कोविड टेस्ट केली, ज्यामध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळली. फ्लाइट उड्डाण करण्यापूर्वी त्या महिलेच्या दोन आरटीपीसीआर चाचण्या आणि पाच रॅपिड अँटीजेन टेस्ट (rapid antigen test) चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्या सर्व निगेटिव्ह आल्या होत्या. पण फ्लाईटमध्ये दीड तासांनंतर तिला त्रास जाणवू लागला. (Chicago woman quarantined in airplane bathroom for 3 hours after testing positive for Covid-19 mid-flight)

हे देखील पहा -

फोटोओ म्हणाली की, 'जेव्हा घसा खवखवत होता तेव्हा मला वाटले, ठीक आहे, मी फक्त चाचणी करणार आहे, यामुळे माझी शंका दुर होईल आणि मला बरं वाटेल असा विचार मी केला, मात्र टेस्ट पॉझिटिव्ह आली. फोटोओ हिने लसीचे दोन्ही डोस आणि एक बूस्टर डोस (Booster Dose) घेतला आहे. मात्र तरीही तिला कोरोनाची लागण झाली. विमानात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर ती थोडी घाबरायला लागली. फोटोआने सांगितलं की, "जेव्हा मी फ्लाइट अटेंडंट रॉकीला याबद्दल पहिल्यांदा सांगितलं तेव्हा मी रडत होते. मी माझ्या कुटुंबासाठी नर्वस होते, कारण त्यांच्यासोबत मी नुकतेच जेवण केले होते. मी विमानातील इतर लोकांबद्दल घाबरले होते. मी स्वतःसाठी घाबरले होते.

जेव्हा विमान उतरले तेव्हा फोटोओ आणि तिचे कुटुंब विमानातून सर्वात शेवटी उतरले होते. तथापि, तिच्या भावाला आणि वडिलांना कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, म्हणून त्यांना त्यांच्या कनेक्टिंग फ्लाइटने स्वित्झर्लंडला जाण्याची परवानगी देण्यात आली. ते म्हणाले की फोटोआची रॅपिड आणि पीसीआर चाचणी विमानतळावर पुन्हा केली गेली, ज्यामध्ये तिला संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये पाठवण्यात आले, जिथे तिला 10 दिवसांसाठी क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आलं आहे. यावेळी एअरपोर्ट कर्मचाऱ्यांनी तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणारी पत्र आणि पुष्षगुच्छही पाठवले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT