Mahakumbh 2025 News Update 
देश विदेश

Mahakumbh 2025 : 'छोटू बाबा' ३२ वर्षांपासून अंघोळीशिवाय, कारण काय?

Mahakumbh News Update : कुंभमेळ्यात हजेरी लावणारे नागा साधू आकर्षणाचे केंद्र आहेत. प्रयागराज येथे आलेल्या तीन फुटी छोटू बाबा (गाणगापुरी) सध्या चर्चेत आहे. त्यानं सर्वांचे लक्ष वेधलेय.

Namdeo Kumbhar

Mahakumbh 2025 News Update : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे १३ जानेवारी २०२५ पासून महाकुंभमेळा सुरू होणार आहे. ४० कोटींहून अधिक भाविक दाखल होती. ४५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभमेळा साठी सरकारकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. साधू, महाराज येथे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. कुंभमेळ्यात हजेरी लावणारे नागा साधू आकर्षणाचे केंद्र आहेत. प्रयागराज येथे आलेल्या तीन फुटी छोटू बाबा (गाणगापुरी) सध्या चर्चेत आहे. त्यानं सर्वांचे लक्ष वेधलेय.

प्रयागराज येथील महाकुंभात आसाममधील कामाख्या पीठातून आलेले 57 वर्षीय गाणगापुरी महाराज म्हणजेच छोटू महाराज लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा आहे. तीन फूट ८ इंच उंची असणारे छोटू बाबा मागील ३२ वर्षे अंघोळीशिवाय राहत आहेत. पण ते इतक्या वर्षे न अंघोळीसाठी का राहिले?

३२ वर्षे अंघोळ का नाही केली?

भाविकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या छोटू बाबांची उंची फक्त 3 फूट 8 इंच इतकी आहे. मागील ३२ वर्षांपासून आंघोळ न केल्याचा दावा छोटू बाबांनी केलाय. महाकुंभमेळ्यादरम्यान येथेच राहणार आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमाच्या काठावर छोटू बाबानेही आपला तळ ठोकला आहे. छोटू बाबा कुंभमेळ्याला येणाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी ३२ वर्षे आंघोळ न करण्यामागचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, 'मी 32 वर्षे अंघोळ केलेली नाही. कारण माझी एक इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. मी गंगेत स्नान करणार नाही.'

गाणगापुरी महाराजांना त्यांची इच्छा सार्वजनिक करायचा नाही. त्यांचा संकल्प पूर्ण झाल्यावर प्रथम क्षिप्रा नदीमध्ये जाऊन अंघोळ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाह्य स्वच्छतेपेक्षा आंतरिक शुद्धता अधिक महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, प्रयागराज महाकुंभात गाणगापुरी महाराज पहिल्यांदाच आले आहेत. गाणगापुरी महाराज हे जुना आखाड्याचे नागा संत आहेत. ते आसामच्या कामाख्या पीठाशी संबंधित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक म्हाडा घोटाळा ED कडे जाणार? बावनकुळे यांचा इशारा; 'त्या' 49 बिल्डरांचे धाबे दणाणले

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा अपघात

डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

SCROLL FOR NEXT