Dhanshri Shintre
यंदाचं नवीन वर्ष 2025 खऱ्या अर्थाने खास असणार आहे, कारण या वर्षाच्या प्रारंभातच कुंभमेळा सुरू होणार आहे.
तब्बल 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरूवात होत आहे.
मात्र, प्रवासासाठी रेल्वे, बस आणि विमानाच्या तिकीटांची कमतरता असू शकते, ज्यामुळे भाविकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने महाकुंभ मेळ्याच्या सुयोग्य आयोजनासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
यामध्ये इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने पुणे ते प्रयागराज अशी एक खास 'भारत गौरव ट्रेन' सुरू केली आहे.
ही विशेष ट्रेन 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान धावेल.
भारत गौरव ट्रेनमध्ये प्रवाशांना आरामदायक प्रवासाची सोय, तसेच जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळेल.
त्यामुळे महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची तयारी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
NEXT: कुंभमेळानिमित्त प्रयागराजमधील 'हे' आहेत लोकप्रिय सर्वोत्तम स्नॅक्स