Dhanshri Shintre
महाकुंभमेळा 2025 हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र धार्मिक सोहळा आहे, जो 13 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला समाप्त होईल.
महाकुंभमेळा प्रत्येक 12 वर्षांनी चार तीर्थक्षेत्रांपैकी एका ठिकाणी होतो. जसे की हरिद्वार, प्रयागराज (अलाहाबाद), उज्जैन, आणि नाशिक.
महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये हिवाळी ऋतूचा आनंद घेताना उबदार आणि पौष्टिक स्नॅक्स आणखी आनंददायक ठरू शकतात.
गजक, मकर संक्रांतीसाठी खास पारंपरिक नाश्ता, मोलॅसिस, शेंगदाणे, आणि बदामाने तयार केला जातो. जानेवारीत या पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थाचा आनंद प्रत्येक घरात घेतला जातो.
कचोडी सब्जी हे प्रयागराजमधील लोकांच्या आवडत्या नाश्त्यापैकी एक आहे.
तिळ आणि गुळाचे लाडू ऊर्जा प्रदान करतात.हिवाळ्यातील थंडीपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. हे चौक आणि कटरा येथील घाऊक बाजारात मिळू शकते.
प्रयागराजची खासियत लाल पेरू, रस्त्यावर पाऊल टाकताच विक्रेते तुम्हाला ताजे आणि रसाळ पेरू विकताना दिसतात.
प्रयागराजमधील पेठा गल्लीत भोपळ्यांपासून तयार केलेला अंगूरी पेठा, हलका आणि गोड नाश्ता म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रयागराजमध्ये दही आणि जिलेबी एकत्र नाश्त्यात खाल्ले जातात. ही जोडी विचित्र वाटत असली, तरी अत्यंत स्वादिष्ट आहे.
NEXT: कुंडीच सहज लावता येणारी भाज्यांची रोपं