Crime Saam Tv
देश विदेश

Shocking Crime: काका की हैवान! ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् नंतर हत्या; कन्या पूजेदरम्यान नराधमाने डाव साधला

Uncle Physical Assaulted 6-Year-Old Niece: एका नराधम काकाने ६ वर्षीय पुतणीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे. नंतर चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह शेजारच्या कारमध्ये लपवून ठेवला.

Bhagyashree Kamble

काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. एका नराधम काकाने ६ वर्षीय पुतणीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे. नंतर चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह शेजारच्या कारमध्ये लपवून ठेवला होता. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील दुर्ग येथे घडली आहे. या घटनेची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, काकाने गुन्हा कबूल केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेसंदर्भात, दुर्गचे एसीपी सुखनंदन राठोड म्हणाले, ५ एप्रिल रोजी चिमुकली कन्या पूजेवरून बराच वेळ घरी परतलीच नाही. त्यानंतर कुटुंबाने शोधाशोध केली आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

राठोड पुढे म्हणाले की, यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. रात्रीच्या वेळी शेजारी उभ्या असलेल्या एका कारमध्ये पोलिसांना मृतदेह आढळला. मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या आणि वैद्यकीय अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले.

पोलिसांनी केला खुलासा

या घटनेसंदर्भात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. त्यानंतर कार मालकासह ३ पैकी २ जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. चौकशीदरम्यान, काकांचा सहभाग असल्याचं उघड झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यानंतर, त्याची कडक चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का! निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

SCROLL FOR NEXT