Elephants Saam tv
देश विदेश

Elephants: मुलांच्या लग्नात हत्तींचा ठरताेय अडसर; ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण

हत्तींमुळे येथे शेकडो लोकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

छत्तीसगड : छत्तीसगडमधील एका भागात हत्तींची (elephants) दहशत इतकी पसरली आहे की, लोक आपल्या मुलींचे लग्नही तिथे करत नाहीत. हत्तींच्या दहशतीमुळे या परिसरातील विवाह सोहळे (wedding) रद्द हाेत नसल्याने येथील मुलांना मुलगी शाेधण्यात ग्रामस्थांना पराकष्ठा करावी लागत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील (Chhattisgarh) प्रतापपूर (Pratappur) भागातील सूरजपूर (Surajpur) जिल्ह्यात सध्या चितेंचे वातावरण पसरले आहे. (wedding latest marathi news)

गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये हत्तींच्या (elephants) दहशतीच्या खूप बातम्या कानावर आल्या होत्या. सरकारी नोंदीनुसार, २०१८ ते २०२०२ या कालावधीत छत्तीसगडमध्ये हत्तींच्या हल्ल्यात २०४ नागरिक लोक मारले गेले, तर याच काळात राज्यात ४५ हत्तीही मारले गेले. गेल्या वर्षी (२०२१) सप्टेंबरमध्येच छत्तीसगडमध्ये हत्तींच्या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता.

"हत्ती घरांची नासधूस करत आहेत आणि गावकऱ्यांना मारत आहेत. लोकांना हत्तींच्या दहशतीला तोंड देणाऱ्या गावात आपल्या मुलींचे लग्न व्हावे असे वाटत नाही," एएनआय या वृत्तसंस्थेने प्रतापपूर नगर पंचायतीच्या सरपंचाच्या माहितीनूसार म्हटले आहे.

या महिन्यात ११ फेब्रुवारीला सूरजपूर जिल्ह्यातील एका गावाच्या सीमेवर ४६ वर्षीय महिलेस जंगली हत्तीने ठार केले. सूरजपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) बीएस भगत म्हणाले ही घटना घुई वनक्षेत्रातील भेलकच्छ गावात घडली, जिथे पीडित गीता देवी गुरुवारी त्यांच्या शेताकडे निघाल्या हाेत्या.

प्रतापपूर वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये हत्तींची दहशत नवीन नाही, गेली १५-२० वर्षे येथे असे प्रकार सुरू आहेत. हत्ती दररोज नागरिकांच्या घरांचे, शेतीचे नुकसान करतात. शेकडो लोकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या भीतीमुळे इतर भागातील लोक आता हत्तींच्या दहशतीमुळे त्यांच्या बहिणींना, मुलींना या गावात लग्न लावून तयार हाेत नाहीत. अन्य भागातील नागरिक यास दुजाेरा देतात. त्यांच्या म्हणण्यानूसार आम्ही आमच्या लेकींना त्या भागात मरण्यासाठी का पाठवयाचे. दरम्यान या प्रकारामुळे येथील अनेक मुले विवाहपासून वंचित राहत असल्याची माहिती समाेर आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या परदेशातून मुसक्या आवळल्या

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

SCROLL FOR NEXT