Chhattisgarh Naxalites killed Saam TV
देश विदेश

Chhattisgarh News: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Chhattisgarh Naxalites killed: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या कारवाई एका महिला कॅडरसह ६ नक्षलवादी ठार झाले

Satish Daud

Chhattisgarh Six Naxalites killed in encounter

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या कारवाई एका महिला कॅडरसह ६ नक्षलवादी ठार झाले आहेत, एका पोलिस अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ २२९ आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी मोहिम आखली आहे.  (Latest Marathi News)

बुधवारी सकाळी बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावाच्या जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला.

यावेळी लपून बसलेल्या नलक्षवाद्यांनी सुरक्षा दलांच्या पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत एका महिला कॅडरसह ६ नक्षलवादी ठार झाले. या भागात अद्याप शोधमोहीम सुरु आहे.

या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्याची विशेष बटालियन कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांच्याशी संबंधित सुरक्षा जवान सहभागी झाले होते, असे पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT