Bhaskaracharya Caught Red-Handed in Car with Woman Saam
देश विदेश

प्रसिद्ध कथावाचकाचं अश्लील कांड; कारमध्ये महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं, नागरिकांनी चोप देत शेंडी कापली

Bhaskaracharya Caught Red-Handed in Car with Woman: रायपूरमध्ये कथावाचक भास्कराचार्याचा अश्लील कांड समोर. विवाहित महिलेसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं. दोघेही शारीरिक संबंध ठेवत होते.

Bhagyashree Kamble

छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील टिकरापारा पोलीस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध कथावाचकाला विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले. दोघेही चारचाकीमध्ये शारीरिक संबंध ठेवत होते. याबाबत माहिती मिळताच महिलेच्या पतीनं घटनास्थळी धाव घेत पत्नीला रंगेहाथ पकडलं. तसेच कथावाचकाला बेदम मारहाण केली. स्थानिकांनी पकडून कथावाचकाची शेंडी कापून टाकली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रेवा येथील प्रसिद्ध कथाकार भास्कराचार्य हे त्यांच्या विवाहित मैत्रिणीला भेटण्यासाठी रायपूरला आले होते. चारचाकीमध्ये दोघेही शारीरिक संबंध ठेवत होते. लैंगिक संबंध ठेवताना दोघांना स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ पकडलं. याबाबत माहिती मिळताच महिलेच्या पतीनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच कथावाचकाला बेदम मारहाण केली.

दोघांना कारमधून बाहेर काढत स्थानिक रहिवाशांनीही बेदम चोप दिला. या घटनेदरम्यान, कथावाचकाची शेंडी कापण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच टिकरापाड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथावाचक मध्यप्रदेशातील अनेक भागात धार्मिक प्रवचने देतात. गेल्या काही महिन्यांपासून कथावाचक महिलेच्या संपर्कात होते. याच काळात दोघांमधील जवळीक वाढली.

या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली कथावाचकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कुणाला अटक करण्यात आली नाही. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक रहिवासी कथावाचक भास्करचार्य यांच्या वर्तनावर प्रचंड नाराज आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT