Road Accident Saam Tv News
देश विदेश

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Chhattisgarh Road Accident: राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत आणि जखमी सर्वजण मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी आहेत.

Bhagyashree Kamble

  • राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ भीषण अपघात.

  • सहा मित्रांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी.

  • इंदूरहून ओडिशाकडे जात असताना कार ट्रकला धडकली.

  • चालकाला झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले.

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारचालक गंभीर जखमी आहे. इंदूरमधील सहा मित्र उज्जेनला भेट देऊन ओडिशाच्या दिशेनं जात होते. परंतु, चिरचरी राष्ट्रीय महामार्ग क्राँसिंगजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यामुळे कारचा चक्काचूर झाला. तसेच कार एका बाजूनं पूर्णपणे तुटली.

या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या सहा मित्रांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

प्रवाशांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ६ मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले. सध्या कार चालकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात आकाश मौर्य, गोविंद, अमन राठोड, नितीन यादव, संग्राम केशरी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

तर, चालक सागर यादव गंभीर जखमी आहे. सर्वजण इंदौर येथील रहिवासी होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदौरहून ६ मित्र कारमधून उज्जैनला गेले. महाकालचं दर्शन घेतल्यानंतर ओडिशाच्या दिशेनं निघाले. त्यांना जगन्नाथ पुरीचं दर्शन घ्यायचे होते. मात्र, शुक्रवारी ५ वाजता राजनांदगावामधील चिरचरी गावाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला.

कार चालकाला झोप लागली आणि कार अनियंत्रित झाली. कार थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या भीषण अपघातानंतर मृत कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT