ड्राय डे असूनही सर्रास मद्यविक्री; मध्यरात्री पार्ट्या सुरूच, पुण्यातील ८ ते १० पबवर कारवाईचा बडगा

Pune Police raid: पुण्यात ड्राय डे असतानाही मद्यविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. रात्री बारानंतरही अनेक पब उघडे ठेवून मद्य विक्री. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांची संयुक्त धडक कारवाई.
Pune Police Raid
Pune Police RaidSaam Tv News
Published On
Summary
  • पुण्यात ड्राय डे असतानाही मद्यविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.

  • रात्री बाराच्या वेळेनंतरही अनेक पब उघडे ठेवून मद्य विक्री.

  • राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांची संयुक्त धडक कारवाई.

  • आकाई, मीलर्स, बी एच के, गेम पलासियो, बॉलर यांसारख्या पबवर गुन्हे नोंद.

अक्षय बडवे, सचिन जाधव, साम टिव्ही

पुण्यात ड्राय डे असतानाही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १५ ऑगस्टनिमित्त ड्राय डे असूनही रात्री दीड वाजेपर्यंत पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. पु्ण्यातील नामांकित पबमध्ये मद्य विक्री सुरू असल्याचं आढळून आलं. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी पबवर संयुक्त धडक कारवाई केली.

१५ ऑगस्टनिमित्त भारतभर ड्राय डे असतो. मात्र, पुण्यात ड्राय डेचं उल्लंघन करण्यात आलं. पुण्यातील पब रात्री दीड वाजेपर्यंत चालू होते. तसेच पबमध्ये रात्री बारानंतरही मद्यविक्री सुरू असल्याचं आढळलं. मद्य विक्री सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला.

Pune Police Raid
मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं; नेमकं काय घडलं?

त्यांनी संयुक्त धडक कारवाई करत पबवर धडक कारवाई केली. पुण्यातील विविध पबविरोधात रात्री बारानंतर मद्य विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील कल्याणी नगर विमान नगर तसेच बंडगार्डन परिसरातील अनेक नामांकित पबवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Pune Police Raid
तीर्थयात्रेला जाताना भीषण अपघात; भरधाव बसची ट्रॅक्टरला धडक, १० प्रवाशांचा जागीच मृत्यू

आकाई, मीलर्स, बी एच के, गेम पलासियो, बॉलर यांसारख्या प्रसिद्ध पबवर कारवाई करण्यात आली आहे. पबवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com