Chhattisgarh Naxal Attack Saam Tv
देश विदेश

Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 10 जवान शहीद

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 10 जवान शहीद

Satish Kengar

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मेलात आहे.

दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी घात घालून जवानांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. आईडी ब्लास्टमध्ये जवानांचा बळी गेला.

नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात रवाना करण्यात आला आहे. मृतांमध्ये 10 डीआरजी कर्मचारी आणि एका चालकाचा समावेश आहे. (Latest Marathi News)

नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही : भूपेश बघेल

नक्षलवादी घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, "हे अत्यंत दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही."

छत्तीसगडमधील आठ जिल्हे नक्षलग्रस्त

सरकारने जाहीर केलेल्या 2021 च्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमधील 8 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. यामध्ये विजापूर, सुकमा, बस्तर, दंतेवाडा, कांकेर, नारायणपूर, राजनांदगाव आणि कोंडागाव यांचा समावेश आहे.

10 वर्षात 3722 नक्षलवादी हल्ले, 489 जवान शहीद

गृह मंत्रालयाने एप्रिल 2021 मध्ये लोकसभेत सांगितले होते की, गेल्या 10 वर्षांत म्हणजे 2011 ते 2020 या काळात छत्तीसगडमध्ये 3 हजार 722 नक्षलवादी हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये 489 सैनिक शहीद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

SCROLL FOR NEXT