Chhattisgarh Mob beat Saam Tv
देश विदेश

Chhattisgarh Mob beat: मुलं चोरीची अफवा; तीन साधूंना जमावाकडून बेदम मारहाण

गावकऱ्यांनी मुलाच्या चोरीच्या अफवेवरून साधूंच्या वेशातील तीन जणांना बेदम मारहाण केली.

साम टिव्ही ब्युरो

रायपूर : छत्तीसगडच्या दुर्गमध्ये तीन साधूंना मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. मुलं चोरीच्या अफवेतून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) अफवा पसरल्यानंतर तीन साधूंना जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं आहे.

संपूर्ण प्रकरण दुर्गमधील भिलाई-3 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे 3 साधूंवर हल्ला करण्यात आला. मूल चोरीच्या संशयावरून गावातील लोकांनी मारहाण केली. दुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, भिलाई-३ पोलीस स्टेशन हद्दीतील चारोडा गावात, गावकऱ्यांनी मुलाच्या चोरीच्या अफवेवरून साधूंच्या वेशातील तीन जणांना बेदम मारहाण केली. (Latest Marathi News)

रस्ता चुकल्याने साधूंवर प्रसंग ओढावला

काही कारणास्तव तिन्ही साधू रस्ता चुकले आणि भिलाई 3 च्या चारोडा बस्तीमध्ये पोहोचले. स्थानिक लोकांनी त्यांना थांबवून चौकशी केली, मात्र चौकशीदरम्यान तिन्ही साधूंना बेदम मारहाण केली गेली. मारहाणीत तीनही साधू रस्तबंबाळ झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कारवाई सुरू केली.

मुलं चोरीच्या अफवा पसरवल्यानंतर या तीन साधूंना लोकांनी मारहाण केली. याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओच्या आधारे चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, सर्व साधूंना किरकोळ जखमा झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सोबतच नागरिकांना अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन दुर्ग पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabestes Control And Liver Detox Drink: कारले की कडुनिंब? कोणता रस लिव्हर, ब्लड शुगर आणि स्किनसाठी सर्वात बेस्ट?

Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर २' ची यशस्वी घोडदौड, सलग तिसऱ्या सोमवारी छप्परफाड कमाई; वर्ल्डवाइड कलेक्शन 1,600 कोटींपार

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए! महिलांचे लैंगिक शोषण कसे केले? खरात बाबाने सर्वच सांगितलं; SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Accident News : अमरावतीत भीषण अपघात! भरधाव कारने दुचाकीला उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याची घोषणा लवकरच; पगार कितीने वाढणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT