धनुष्यबाणाचा उद्या फैसला; ठाकरे गटाच्या 'त्या' दाव्यामुळे निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता

शिवसेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडण्याची मुदत 7 ऑक्टोबरला म्हणजे उद्या संपत आहे.
Shivsena Symbol Dispute
Shivsena Symbol DisputeSaam TV
Published On

शिवाजी काळे -

नवी दिल्ली: शिवसेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडण्याची मुदत 7 ऑक्टोबरला म्हणजे उद्या संपत आहे. त्यामुळं उद्या नक्की काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणूकीसाठी उद्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ( Andheri East Assembly Elections)

त्यामुळं निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारवाईकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शिवसनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात उद्या निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट कागदपत्रं सादर करणार आहे.

एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचं सांगत आहे. त्यामुळं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

निवडणूक आयोगात नक्की काय घडलं आत्तापर्यंत?

पाहा व्हिडीओ -

सुरुवातीला शिंदे गटाने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचं सांगत आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळावं असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता.

त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली. एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलीपी देण्याचे आदेश दिले. मात्र, शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे जोपर्यंत कागदपत्र मिळत नाहीत.

तोपर्यंत उत्तर कसे देणार? असा ठाकरे गटाचा सवाल आहे. त्यामुळं उद्या निवडणूक आयोगासमोर काय घडतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसंच या संदर्भात वकिलांशी बातचीत केली असता उद्या फक्त कादगपत्रांची पुर्तता होईल. असं वकिलांचं म्हणणं आहे.

दरम्यान अजूनही दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. शिंदे गटाचे नेते वारंवार दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचं उदाहरण देत असतात. या प्रकरणामध्ये नक्की काय झालं होतं हे जाणून घेऊया.

प्रकरण क्रमांक 1

Shivsena Symbol Dispute
Nana Patole: मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट एकनाथ शिंदे वाचत होते; नाना पटोलेंचा आरोप

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे लहान बंधू पशुपतिनाथ यांच्यासोबत गेले. तरीही पक्षसंघटना रामविलास पासवान यांच्यासोबत राहिल्याने निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह गोठवलं. मात्र, पक्ष चिराग पासवान यांच्याकडेच राहिला. या संदर्भात अजूनही सुनावणी सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे यांचं प्रकरण चिराग पासवान यांच्या प्रमाणेच असल्याचा दावा जाणकार करतात.

प्रकरण क्रमांक - 2

1969 मध्ये इंदिरा गांधी यांचे पक्षातील अनेक नेत्यांसोबत संबंध ठीक नव्हते. या दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते निजलिंगप्पा आणि इंदिरा गांधी यांच्यात वाद झाला. निवडणूक आयोगाने काँग्रेसचे मूळ चिन्ह नांगरणारा शेतकरी निजलिंगप्पा यांना मिळालं. तर इंदिरा गांधी यांना गाय वासरू हे चिन्ह मिळालं. पुढे 1977 मध्ये निवडणूक आयोगाने निजलिंगप्पा यांच्या पक्षाचं चिन्ह देखील गोठवण्यात आलं.

प्रकरण क्रमांक - 3

1979 मध्ये कॉंग्रेस पक्षात मोठी फुट पडली. निवडणूक आयोगाने इंदिरा गांधी यांच्या गटाला हाताचा पंजा हे चिन्हं दिलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com