छत्तीसगड भाजपचे माजी मंडल महामंत्री विशंभर यादव यांनी मुख्यमंत्रीला पत्र लिहिलं.
अपघातानंतर दिव्यांग झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी इच्छामरणाची मागणी केली.
संघटनेकडून मदत न मिळाल्याने त्यांच्यावर गंभीर ताण आला आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजप नेत्यानं इच्छामरणाची मागणी केलीय. छत्तीसगडमधील सूरजपूर भाजपचे माजी मंडल महामंत्री विशंभर यादव हे एका अपघातानंतर दिव्यांग बनले होते. त्यांनी मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांना पत्र लिहून इच्छा मृत्यूची मागणी केलीय. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठीही आता पैसे शिल्लक नाहीत, त्यामुळे मला इच्छामरण हवं आहे. असे पत्र विशंभर यादव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय.
दोन वर्षापूर्वी रायपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होती. त्यात सहभागी होण्यासाठी भाजपाचे तत्कालीन मंडल महामंत्री विशंभर यादव कार्यकर्त्यांसोबत बसमधून जात होते. त्यावेळी बसचा अपघात झाला. या अपघातात विशंभर यादव यांना गंभीर दुखापत झाली, त्यांना ते कायमचे दिव्यांग बनले. आता घरची परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक ताण त्यांच्यावर आलाय. संघटनेकडूनही मत मिळत नसल्याने विशंभर यादव यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केलीय.
तर आपण शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झालो आहोत. आपल्या कुटुंबालाही माझ्यामुळे त्रास होतोय. ज्या पक्षासाठी आयुष्य घालवलं त्या पक्षाकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून आपण इच्छामरण मागितले आहे. भाजप आता पूर्वीसारखा राहिलेला नाहीये. आधी कार्यकर्त्यांचा आदर केला जात होता.
पण आता त्यांची अवस्थाही विचारायला कोणी येत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखलीय. तर दुसरीकडे विशंभर यादव यांच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मदतीचं आश्वासन दिलंय.
आर्थिक तंगीमुळे भाजप नेते विशंभर यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी केली. त्यानंतर मी त्यांच्या पत्नीशी संवाद साधला. या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत,असा धीर दिल्याचं भूपेश बघेल म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.