देश विदेश

Naxals Encounter: बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत २२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh Naxals Encounter: कांकेर-नारायणपूर सीमा भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती.संयुक्त पोलीस दल नक्षलवाद्याच्या शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाकडून मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला.

Bharat Jadhav

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. गंगालूर पीएस लिमीटजवळील बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा दलाने २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. याप्रकरणी बिजापूर पोलिसांनी माहिती दिलीय.

गांगलूर पीएस हद्दीजवळील बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील जंगल परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे, त्यातून त्यांचा खात्मा केला जात आहे. दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक चालू आहे.

नक्षलवाद्यांचे ठिकाण नष्ट करण्यासाठी सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात मोहीम उघडलीय. यापार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरू केलीय. आज सुरक्षा दलाला नक्षलवाद्याची माहिती मिळाली होती. त्याच्या शोध सुरक्षा जवानांकडून घेतला जात होता. त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सकाळी सात वाजेपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये गोळीबार चालू आहे. चकमक झालेल्या ठिकाणाहून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारू गोळा जप्त केला आहे. दरम्यान या गोळीबारीत सुरक्षा दलातील डीआजीचा एक जवान शहीद झालाय.

चकमकीच्या ठिकाणाहून एके ४७, एसएलआर सारख्या मोठ्या ऑटोमॅटिक रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. नक्षलवादी कमांडर पापा राव या भागात सक्रिय आहेत. 40 ते 45 नक्षलवाद्यांना जवानांनी घेरले होते. नक्षलवाद्यांची पश्चिम बस्तर विभागीय समिती सक्रिय होती. मात्र या परिसराला नक्षलवाद्यांचे विद्यापीठ म्हटले जाते.

कांकेर-नारायणपूर सीमा भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. संयुक्त पोलीस दल नक्षलवाद्याच्या शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाकडून मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. गेल्या महिन्यात बिजापूर परिसरातही कारवाई करण्यात आली होती. बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात ही कारवाई करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT