Chhattisgarh Crime News Saam tv
देश विदेश

Raigarh Crime News: क्रूरतेचा कळस! चोर चोर म्हणून चिडवल्याचा राग; निर्दयी बहिणीने भावालाच संपवले

Chhattisgarh Crime News: काही दिवसांपूर्वी दहा हजार रुपये चोरी झाले होते. त्या घटनेनंतर तिच्या चोर म्हणून हिणवत होते.

Gangappa Pujari

Chhattisgarh Crime: छत्तीसगढच्या रायगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यात ११ वर्षांच्या मुलाच्या हत्येने खळबळ माजली होती. आरोपीने मुलाचा धारदार शस्त्राने खून केला होता. पोलिसांनी आता या घटनेचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये मुलाच्या चुलत बहिणीनेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, २५ मे रोजी गावातील (Chhattisgarh News) सरकारी शाळेत एका पृथक नावाच्या ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. ज्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. मृतदेह पाहून गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी उपस्थित होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

तपास करताना पोलिसांना पृथकचे तो इंग्रजी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती मिळाली. ज्यानुसार पोलिसांनी तपास कार्याला सुरूवात केली होती. सुरूवातीला या प्रकरणात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने पोलिसही हैराण झाले होते. मात्र त्यांना या कार्यात डॉग स्कॉडमधील रुबी नामक कुत्र्याने मोठी मदत केली. (Latest Marathi News)

शुल्लक कारणावरुन बहिणीनेच भावाला संपवले....

या हत्येचा गुंता सोडवण्याकरिता डॉग स्कॉडमधील रुबी या श्वानाला पाचारण केले होते. घटनास्थळी पोलिसांनी कसून शोध घेतला असता हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले धारदार हत्यार मिळेल. रुबीने त्या हत्याराचा वास घेतला व त्यानुसार तो पृथकच्या काकाच्या घरी जाऊन पोहोचला. तिथे पृथकची मोठी बहिण उमाच्या जवळ रुबी घुटमळत होती. वारंवार रुबी उमाकडे पाहून भुंकत होती. 

पोलिसांनी या उमाकडे तपास केला असता तिने सुरूवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला. तसेच काही दिवसांपूर्वी पृथकच्या घरातून दहा हजार रुपये चोरी झाले होते. त्या घटनेनंतर तिच्या काकाचे कुटुंबीय तिला चोर म्हणून हिणवत होते. याचाच बदला घेण्यासाठी मी पृथकला जीवे मारल्याचेही कबुल केले. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

SCROLL FOR NEXT