Chhattisgarh Wife Killed Husband Saam TV
देश विदेश

Husband Wife Clash: पती-पतीच्या वादाचा भयानक अंत; नवऱ्याची हत्या करून मृतदेह किचनमध्ये जाळला, खळबळजनक घटना

Chhattisgarh Crime News: पत्नीने पतीची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह किचनमध्ये नेऊन जाळला.

Satish Daud

Chhattisgarh Crime News: गेल्या काही दिवसांपासून देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे पती-पत्नीचा वाद, प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबधातून घडत आहेत. अशीच एक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. येथे एका पत्नीने पतीची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह किचनमध्ये नेऊन जाळला. (Latest Marathi News)

दिलीप सोनी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी दिलीपची पत्नी संगीता सोनी हिला ताब्यात घेतलं आहे. पत्नीनेच पतीची हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्तीगडच्या दुर्ग जिल्ह्यातील सुपेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दिलीप सोनी हा कृष्णा नगरमध्ये पत्नी संगीतासोबत येथे राहत होता. दारूचे व्यसन असल्यामुळे दिलीप आणि संगीतामध्ये नेहमी वाद व्हायचे.

अनेकदा दिलीपने संगीताला दारूच्या नशेत मारहाण (Crime News) देखील केल्याचं शेजारच्यांनी सांगितलं. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास दिलीप घरी दारू पिऊन आला. त्याने दारूच्या नशेत संगीताला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

वाद इतका विकोपाला गेला, की दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं. या भांडणात संगीताने दिलीपची ओढणीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तिने मृतदेह किचनमध्ये नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दिलीपचा लहान भाऊ घरी आला.

घडलेला प्रकार पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सकरली. त्याने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. संगीताने सुरूवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र, महिला पोलिसांनी खाकी दाखवताच तिने आपला गुन्हा मान्य केला. याप्रकरणी मृत दिलीपच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संगीताला ताब्यात घेतलं असून तिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

SCROLL FOR NEXT