Romance On Bike viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: अरे आवरा ह्यांना! चालू गाडीवर घट्ट मिठी अन् किसिंग... तरुण- तरुणीचा भररस्त्यात खुल्लमखुल्ला रोमान्स; पाहा VIDEO

Romance On Scooty Video: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिलासपूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे

Gangappa Pujari

Romance On Bike Chattisgrah Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी सध्याची तरुणाई कधी काय करेल याचा काही नेम नाही. कधी बाईकवर स्टंटबाजी करत तर कधी रस्त्यावर डान्स करत हे तरुण चर्चेत येत असतात. मात्र अनेकदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. सध्या अशाच एका तरुण तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

आजची तरुणी पिढी जीवाची पर्वा न करता अनेक धक्कादायक स्टंट करताना दिसून येतं आहे. स्वत:सोबतच इतरांचाही जीव हे लोक धोक्यात घालतात. सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्त करण्याचा नवीनच ट्रेंड पाहिला मिळतं आहे.

या वर्षांची सुरुवात बाइकवर खुल्लम खुल्ला प्रेम करताना कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग काय बघता बघता असे अनेक व्हिडीओ (Viral Video) गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले. पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला असून धावत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बिलासपूरमधील आहे. ज्यामध्ये तरुण स्कूटी चालवत असताना त्याची गर्लफ्रेंड समोरच्या बाजूने त्याच्या मांडीवर बसली होती. तो गाडी चालवत होता आणि ती त्याला मिठी मारुन बसल्याचे दिसत आहे. अधून मधून ती त्याला किस करतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिलासपूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. वाहतूक नियमाचं उल्लघंन आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे तरुणाला 8800 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच तरुणाने कान पकडून पोलिसांची माफी मागितली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ ट्वीटवर Govinda Prajapati या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अरे! कोई तो बताओ अब इस प्यार को क्या नाम दिया जाए? असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना तरुण तरुणीला खडेबोल सुणावले आहेत. तसेच तुमच्यामुळे बाकीच्यांचा जीव का धोक्यात घालत आहात, असा सवालही उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT