ओबीसींच्या राष्ट्रीय बैठकीसाठी भुजबळ दिल्लीत, शरद यादवांसह अनेक नेते राहणार उपस्थित... twitter/@Profdilipmandal
देश विदेश

ओबीसींच्या राष्ट्रीय बैठकीसाठी भुजबळ दिल्लीत, शरद यादवांसह अनेक नेते राहणार उपस्थित...

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी (OBC) नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार आहे.

वृत्तसंस्था

रश्मी पुराणिक, मुंबई

नवी दिल्ली: ओबीसींच्या राष्ट्रीय बैठकीसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज नवी दिल्लीत (New Delhi) दाखल झाले आहेत. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी (OBC) नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला छगन भुजबळांसह (Chhagan Bhujbal) शरद यादव, लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी इत्यादी दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. (Chhagan Bhujbal arrives in Delhi for NATIONAL OBC CONVENTION, many leaders including Sharad Yadav will be present)

हे देखील पहा -

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिल्यानंतर ओबीसी समाजाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्येही हीच परिस्थिती असल्याने एकुणच देशभरातील ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे. ओबीसींच्या देशभरातील आरक्षणाच्या या समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत हे 'राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन' भरवण्यात येणार आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५:३० पर्यंत हे अधिवेशन असणार आहे.

या अधिवेशनात शरद यादव, छगन भुजबळ, तेजस्वी यादव, कनिमोझी करुणानिधी, कांचा इलैया शेपर्ड आणि सुनील सरदार इत्यादी नेते उपस्थित असणार आहे. त्याचप्रमाणे पी. विल्सन, मनोज झा, सुभाषिनी यादव, शेफालिका शेखर, के. राजू. प्रोफेसर दिलीप मंडल, अरविंद कुमार, लालूप्रसाद यादव, सचिन पायलट, सीताराम येचुरी, डी. राजा, कॅप्टन अजय यादव इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanjhanaa : सोनम कपूरचा 'रांझणा' पुन्हा प्रदर्शित होणार; AIनं चक्क क्लायमॅक्स बदलला, रिलीज डेट काय?

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

JioPC: टीव्हीला संगणक बनवा JioPC च्या किफायतशीर प्लॅनसह, फक्त ५९९ रुपयांत

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनला लाडकीला ओवाळणी मिळणार! २९८४ कोटींचा निधी वर्ग, खात्यात ₹३००० खटाखट येणार?

SCROLL FOR NEXT