Chennai News SaamTv
देश विदेश

Chennai News : iPhone पडला दानपेटीत, परत करण्यास मंदिराचा नकार; युवकाला मिळालं फक्त सिम कार्ड

iPhone Fell In Donation Box : दानपेटीतल्या प्रत्येक गोष्टीवर मंदिराचा अधिकार म्हणत मंदिराच्या विश्वस्तांनी दानपेटीमध्ये चुकून पडलेला आयफोन परत करण्यास नकार दिला.

Saam Tv

Chennai iPhone Case : मंदिरात देवदर्शनानंतर बरेचसे लोक तेथे असलेल्या दानपेटीमध्ये आपल्या इच्छेनुसार पैसे दान करत असतात. काहीजण दान म्हणून पैसे देतात, तर काहीजण महागड्या गोष्टी अर्पण करत असतात. दरम्यान दानपेटी आणि दान देण्यासंबंधित एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. चैन्नईच्या अरुलमिगु कंदास्वामी मंदिरामध्ये एका तरुणाचा आयफोन चुकून दानपेटीमध्ये पडला. पुढे त्याने मंदिराच्या विश्वस्ताकडे फोन परत करण्याची विनंती केली. पण तरुणाची विनंती नाकारत आयफोनमधील सिमकार्ड परत केले.

तामिळनाडूच्या विनायकपुरम येथे राहणारा दिनेश मागच्या महिन्यात त्याच्या कुटुंबासह अरुलमिगु कंदास्वामी मंदिरामध्ये गेला होता. देवाचे दर्शन घेतल्यानंतर पैसे दान करायला म्हणून तो दानपेटीजवळ गेला. खिशातून पैसे काढत असताना अनावधानाने त्याचा महागडा आयफोन दानपेटीमध्ये पडला. दानपेटीच्या उंचीमुळे त्याला आयफोन काढणे शक्य झाले नाही.

झालेला प्रकार दिनेशने मंदिराच्या विश्वस्त पदाधिकाऱ्यांना सांगितला. तेव्हा 'दानपेटीमध्ये गेलेली प्रत्येक गोष्ट मंदिराची संपत्ती आहे.' असे विश्वस्तांनी दिनेशला सांगितले. नाईलाजाने दिनेश आयफोनविना घरी परतला. अरुलमिगु कंदास्वामी मंदिराच्या प्रथेनुसार, एका महिन्यात दोनदा दानपेटी खुली करण्यात येते. तेव्हा दानपेटी उघडण्याच्या वेळेस दिनेश मंदिरात पोहोचला आणि त्याने पुन्हा एकदा आयफोन परत करण्याची विनंती मंदिराकडे केली. यावेळेसही विश्वस्तांनी दानपेटीमध्ये गेलेली कोणतीही गोष्ट ही मंदिराची संपत्ती असल्याचे सांगितले. दिनेशकडून आयफोन चुकून दानपेटीमध्ये पडला असला तरीही तो परत करता येणार नाही, असेही म्हटले.

दिनेशने हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एन्डॉमेंट्स कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करत मंदिराने आयफोन परत करावा अशी मागणी केली. आयफोन न देता आम्ही तुला सिम कार्ड देऊ शकतो, जेणेकरुन तुम्ही फोनमधला महत्त्वपूर्ण डेटा परत मिळवू शकता असा पर्याय विश्वस्तांनी दिनेशसमोर ठेवला. पण तोपर्यंत दिनेशने नवीन सिम कार्ड विकत घेऊन त्याचा वापर सुरु केला होता.

दरम्यान, या प्रकरणावर मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "मंदिराच्या परंपरेनुसार दानपेटीमध्ये असलेली कोणतीही वस्तू ही देवाची संपत्ती आहे. त्यामुळे ती परत करता येणार नाही. कदाचित दिनेशने दान म्हणून आयफोन दानपेटीमध्ये अर्पण केला आणि नंतर त्याने निर्णय बदलला. दानपेटीला लोखंडी कुंपण असल्याने फोन त्यात पडणं कठीण आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT