Online gambling Canva
देश विदेश

Chennai Suicide: आई कॅन्सरने पीडित, उपचारांसाठीचे पैसे मुलाने ऑनलाईन जुगारावर उडवले, नंतर जे झालं ते..

Online gambling case: कॅन्सरग्रस्त आईचे पैसे चोरुन तरुणाने ऑनलाईन जुगार खेळल्याची धक्कादायक घटना चेन्नई शहरात घडली आहे. चोरी पकडली गेल्यानंतर या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं.

Saam Tv

भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आपले नशीब आजमवण्यासाठी किशोरवयीन मुलेदेखील जुगार खेळू लागली आहेत. यातून ते जुगारासारख्या वाईट सवयीच्या आहारी जात आहेत. तरुणांना लागलेल्या या वाईट व्यसनामुळे अनेक वाईट प्रकार घडत आहेत. चेन्नईमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एका तरुणाने आपल्या कॅन्सरग्रस्त आईचे पैसे जुगार खेळण्यासाठी वापरले आणि चोरीबद्दल कळल्यावर आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या चिन्नामल्लई येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय होती. त्याचे वडील ८ वर्षांपूर्वी वारले. वडिलांच्या निधनानंतर तो कॅन्सरग्रस्त आई आणि भावासह राहत होता. दरम्यानच्या काळात तो हॉटेल व्यवसायामध्ये कार्यरत होता.

करोना काळात या तरुणाने जुगार खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने काम सोडून फक्त जुगार खेळायला सुरुवात केली. त्यासाठी तो सतत घरत्यांकडे पैशांची मागणी करत होता. या तरुणाची आई कॅन्सरने पीडित आहे. तिने उपचारांसाठी काही पैसे जपून ठेवले होते. जुगाराच्या नादापायी या तरुणाने कॅन्सरग्रस्त आईने उपचारासाठी साठवलेले ३० हजार रुपये चोरले. शुक्रवारी चोरीप्रकरणाबद्दल त्याच्या आईला आणि भावाला समजले.

त्यानंतर त्यांनी तरुणाला जाब विचारला. मात्र सर्व प्रकार घरी समजल्यानंतर हा तरुण घरातून पळून गेला. त्यानंतर शनिवारी दुपारी घरच्या गच्चीवर सदर तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं उघड झालं. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT