Maharashtra Politics: महायुती सरकारचं खातेवाटप ठरलं! कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार?

Mahayuti Cabinet: सरकारमधील ४२ मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर खाते वाटपाची यादीर जाहीर केली जाणार आहे.
Cabinet Portfolio
Maharashtra PoliticsTimes Of India
Published On

महायुती सरकारचं खातेवाटप थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मंत्रिमंडळातील ४३ पैकी ४२ मंत्र्यांना खाती दिली जाणार आहेत. या मंत्र्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. अधिवेशन संपताच खातेवाटपाची यादी सार्वजनिक जाहीर केली जाणार आहे. महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणती खाती मिळणार हे थोड्याच वेळ्यात जाहीर होणार आहे.

राज्य सरकारच खाते वाटप झालं नसल्यानं विरोधकांनी टीका केली होती. राज्याचा कारभार फक्त देवेंद्र फडणवीस बघत असल्याचंही विरोधक म्हणत आहेत. आता सहा दिवसांचं हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर सरकारकडून खातेवाटप केले जाणार आहे. राज्यपालांकडे खाते वाटपाची यादी पाठवण्यात येणार आहे.

महायुतीच्या सरकार स्थापनेआधीच मंत्र्यांच्या खातेवाटपावरून वाद सुरु होता. आता अखेर खाते वाटप केलं जाणार आहे. खाते वाटपावरून मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलीय. तिन्ही पक्षातील नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल असं गोगावले म्हणालेत. तिन्ही पक्षाची हरकत नाहीये. तिन्ही नेत्यांनी बसून ठरवलं आहे. आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडून चहापानी नाश्ता करुन आलो आहोत.

आज खाटेवाटप होईल, असं वाटतंय. तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. पालकमंत्री काय असेल ते ठरवतील. रायगड पालकमंत्री आमच्या नशिबात असावं असं वाटतंय. त्यावेळेला मी मंत्री नव्हतो आता आहे. आम्ही महायुतीत होतो आणि आमची इच्छा आहे. विभाग आत्ताच नाही सांगत, असं गोगावले म्हणालेत. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे मंत्र्यांच्या नावाची खाती पाठवण्यात आलीय.

कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती दिली हे जाहीर होणार आहे. गृह, नगरविकास, अर्थखातं कोणाला मिळणार पाहणं औत्सुक्यांच ठरणार आहे. मुख्यमंत्री आणि २ उपरमुख्यमंत्री सोडून पक्ष निहाय मंत्री जाहीर केले जातील. भाजपकडे मुख्यमंत्रिपदासह १६ कॅबिनेट तर तीन राज्यमंत्री पदे देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com