Chennai Crime Saam Tv
देश विदेश

Crime: घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचं कारमधून अपरहण, गुंगीचे औषध देऊन बलात्कार

Chennai Crime: चेन्नईमध्ये उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. घरी निघालेल्या या तरुणीचे कारमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

Priya More

Summary:

  • चेन्नईमध्ये उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार

  • तरुणीचे कारमधून अपरहण करण्यात आले

  • गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला

  • या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत

चेन्नईमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे दोनदा अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला मॉर्फ केलेले फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग देखील करण्यात आले. या घटनेमुळे चेन्नईमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

पीडित तरुणी ९ मार्च रोजी संध्याकाळी कोट्टूरपूरम पोलिस ठाण्याच्या हद्दातील रस्त्यावरून चालत जात होती. त्याचवेळी काही तरुण तिथे आले. त्यांनी कारमधून तिचे अहरण केले. तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर अत्याचार केले. एका तासानंतर तिला कारमधून खाली उतरव्यात आले.

घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तरुणीने असाही आरोप केला की घटनेच्या दुसऱ्या दिवशी दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून तिला व्हॉट्सअपवर मेसेज आले. यामध्ये तिचे मॉर्फ केलेले फोटो होते. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लांब केसांसाठी ५ सोपे उपाय| Long Hair Tips

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेंवर आंदोलनात शाईफेक

Papaya leaf tablets: केमोथेरपीनंतर प्लेटलेट्स वाढवणाऱ्या पपईच्या गोळ्या घेताय? नवीन रिपोर्ट्समुळे चिंता वाढली

Abhijit Dipke : जंतर-मंतरवर राडा! आंदोलक अभिजीत दिपकेंवर महिलेने फेकली शाई, अर्वाच्य भाषेत शिवीगाळही

Crime News : डोंबिवलीत खळबळ! लग्नाचं आमिष दाखवून महिलांना लुटणारा सराईत भामटा गजाआड; उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT