आजोबांची चूक! 5 वर्षाचा चिमुकला ज्यूस समजून प्यायला दारु अन्... Saam TV
देश विदेश

आजोबांची चूक! 5 वर्षाचा चिमुकला ज्यूस समजून प्यायला दारु अन्...

दारुची बाटली नातवाच्या हाताला लागू नये अशी त्यांनी ठेवली.

वृत्तसंस्था

चेन्नई: आपल्या आजोबांनी ठेवलेला दारू चुकून ज्यूस समजून प्यायल्याने ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ६२ वर्षांच्या आजोबांना मुलाचे हाल पाहून धक्का बसला. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चिन्नासामी (६२) यांनी दारूच्या दुकानातून ब्रँडीची बाटली खरेदी केली होती. आजोबांनी दारू बऱ्यापैकी सेवन केल्यानंतर उरलेली एके ठिकाणी ठेवली होती. बाटली नातवाच्या हाताला लागू नये अशी त्यांनी ठेवली.

चिन्नासामी यांना दारूच्या नशेत झोप लागली आणि जे व्हायचं नव्हतं ते झालं. नातवाच्या हाती ती बाटली सहज लागली आणि ज्यूस समजून तो ती चक्क प्यायली, असे तक्रारीत म्हटले आहे. दारु पिल्यानंतर रुकेशचा श्वास कोंडू लागला आणि त्यावेळी त्याचे पालक मदतीसाठी धावले. चिन्नासामीही जागे झाले आणि त्यांच्या नातवाची अवस्था पाहून त्यांना आश्वर्याचा धक्का बसला. ६२ वर्षीय आजोबांना दम्याचा त्रास होता त्यामुळे बेशुद्ध अवस्थेतील नातवाला पाहून त्यांची प्रकृती बिघडली.

कुटुंबाने दोघांनाही एका खासगी दवाखान्यात दाखल केले जेथे चिन्नासामी यांना मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयाने रुकेशला ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास आले. तेथे उपचाराला प्रतिसाद न देता त्याचा देखील मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह वेल्लोर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! महायुती-महाविकास आघाडीला धक्का, मुंडेंनी स्थापन केला नवा पक्ष|VIDEO

सख्खे भाऊ पक्के विरोधक! ऐन निवडणुकीत आमदाराच्या भावानं साथ सोडली, भाजपचं कमळ हाती घेणार

KDMC Election : एकनाथ शिंदेंचा मित्रपक्ष भाजपलाच जोरदार धक्का; डोंबिवलीत मोठी उलथापालथ

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, पुण्यातील मराठा सेवकांची मागणी

Rupali Thombare Photos: फ्रायरब्रँड नेत्या, रुपाली पाटील ठोंबरेंविषयी 'या' 6 गोष्टी माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT