Heart Attack Death Saam TV
देश विदेश

Heart Attack Death : बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने जीममध्येच मृत्यू, 'मिस्टर तामिळनाडू'चा पटकावला होता खिताब

Chennai News : 41 वर्षीय बॉडी बिल्डर योगेशचा रविवारी जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

प्रविण वाकचौरे

Body Builder Death :

बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्ये हृदयविकार म्हणजेच हार्टअटॅकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. तर काही घटनांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम करण्याच्या सल्लाही अनेक तज्ज्ञ देतात. मात्र एका बॉडी बिल्डरचा जीममध्येच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईच्या कोराट्टूर येथे ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय बॉडी बिल्डर योगेशचा रविवारी जीममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. योगेश 2022 पासून जीमपासून दूर होता. मात्र पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याने पुन्हा तयारी सुरू केली होती. ज्यासाठी तो सतत जीममध्ये जाऊन घाम गाळत होता. याआधी योगेशने 'मिस्टर तामिळनाडू'चा किताब पटकावला होता.

दरम्यान तो कोरट्टूर जिममध्ये जिम ट्रेनर म्हणून लोकांना प्रशिक्षण देत होता. मृत्यूच्या काही तास आधीही तो प्रशिक्षण देत होता. त्यानंतर जीम केल्यानंतर योगेशने व्यायामशाळेत स्टीम बाथ घेण्यासाठी गेला.

मात्र बराच वेळ झाला तरी आतून काही आवाज येत नव्हता. त्यानंतर जीममधील तरुणांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी योगेश बाथरूममध्ये जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

क्षणाचाही विलंब न करता तरुणांनी योगेशला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. योगेशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT