Scenes from the Sangareddy chemical factory blast: fire and devastation after the explosion killed 10 and injured over 20 workers. PTI
देश विदेश

Factory Blast : केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट, १० मजुरांचा होरपळून मृत्यू, २० जखमी

Telangana Factory Blast News : तेलंगणातील संगारेड्डी येथे केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोटात १० मजूरांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या आगीत फॅक्टरीचा काही भाग कोसळला. सध्या बचावकार्य सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Telangana chemical factory blast kills 10 workers : तेलंगणामध्ये गोळ्या-औषधं तयार करणाऱ्या फॅक्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत २० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्नशामन दल घटनास्थळी दाखल झाले.

संगारेड्डी येथील सिगाच्या नावाच्या फॅक्ट्रीमधील रिएक्टर यूनिटमध्ये सोमवारी सकाळी भयंकर स्फोट झाला, त्यावेळी १०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते. स्फोट इतका भयंकर होता की मृतदेह १०० फूटावर जाऊन पडले होते. फॅक्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की तो काही किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटानंतर फॅक्ट्रीमध्ये भीषण आग लागली. क्षणात जिकडे तिकडे आगीचे लोळ पसरले होते.

मृतदेह १०० मीटर दूर फेकले गेले

स्फोटानंतर फॅक्टरीत एकच गोंधळ उडाला. स्फोट अतका भयंकर होता की काही मृतदेह १०० मीटर दूर फेकले गेले. काही मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनुसार अजूनही काही लोक फॅक्टरीत अडकले असण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. घटनास्थळी ४ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

१०० हून अधिक कर्मचारी कार्यरत

सिगाची फार्मा कंपनी औषधनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरचे उत्पादन करते. सोमवारी सकाळी फॅक्टरीमध्ये स्फोट झाला त्यावेळी १०० हून अधिक कर्मचारी काम करत होते. प्रशासनाने फॅक्टरीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. स्फोटामुळे फॅक्टरीच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहितीही समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT